सोशल

स‌द्भावना मंच अहमदनगर डॉक्टर रफिक सय्यद पारनेर

स‌द्भावना मंच अहमदनगर डॉक्टर रफिक सय्यद पारनेर

संत तुकाराम म.

संत शेख महंमद म.

बंधू भगीनींनो, संपूर्ण भारतासह महाराष्ट्राला सर्व धर्मीयांमधील परस्पर शांती – सलोखा व सद्भावनेचा महान वारसा लाभलेला आहे. उदा.-१. अ) संत तुकाराम महाराज आणि हजरत शेख अनगढ शाह फकीर (रह.) यांच्यात असलेली पराकोटीची स‌द्भावना. ब) तुकोबा लिखित अभंग “अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारु अल्ला खिलावे। अल्ला बगर नही कोये । अल्ला करे सो हि होये ।”क) “अल्ला एक तु । नबी एक तु ।” या चरणात तर तुकोबांनी नबी अर्थात मुहंमद (स.) साहेबांचाही आदरपूर्वक उल्लेख केला आहे. २) श्रीगोंद्याचे संत शेख महंमद महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. ३) अहमदनगर येथील विख्यात सूफी हजरत शाहशरीफ (रह.)

यांच्या प्रती असलेल्या परम आदरामुळेच मालोजीराजे भोसले यांनी

आपल्या दोन्ही मुलांची नावे अनुक्रमे शहाजी आणि शरीफजी अशी

ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजीराजेंचे सुपुत्र आहेत.३) संत परंपरेतील शिरोमणी संत कबीर हे जुलाहा अर्थात मोमीन बिरादरीतील असून ते मुस्लिम आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कबीरांना गुरु मानत असत ४) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी पैगंबर मुहंमद (स.) व कुराना विषयी असलेल्या आदरामुळेच पैगंबरांनी घडविलेल्या उदात्त क्रांतीचे गुणगाण करणारा “जहाँमर्द मुहंमद (स.)” हा पोवाडा लिहिला आहे. फुले दाम्पत्याला अत्यंत पडत्या काळात सर्वतोपरी सहकार्य करणारे आणि सावित्रीमायींच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसा पासुन शिक्षीकेची भूमिका निभावणारी मुस्लिम भगीनी फातीमाबी शेख, उस्मान शेख व मुंशी गफ्फार बेग यांचे योगदान अविस्मरणीय आहे. ५) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरु केलेली कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डीग जी आजही कार्यरत आहे व महाराजांनी मूळ अरबीतील कुरानाचे मराठीत केलेले पहिले भाषांतर या सर्व बाबी परस्पर सद्भावनेचा प्रचंड वारसा आहेत. महाराष्ट्रातील हा सदभावनेचा वारसा खूप व्यापक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या “बहिष्कृत भारत” या वृत्तपत्रात पैगंबर जयंती निमित्त त्यांचा गुणगाण करणारे संपादकीय लिहिले आहेत. वारकरी सम्प्रदायाचा तर पायाच समता व बंधुत्वावर आधारित आहे.वारकऱ्यांचा ईश्वरच विश्वात्मक, यूनीव्हर्सल आहे. तो कोणा एका

समाजाचा, देशाचा वा एका जातीच्या लोकांचा कदापी नव्हे. फुलेंनी त्याला निर्मिक म्हटले आहे. संतांनी त्याला सकल चराचर सृष्टीचा निर्माता, शासक, मालक व पालन पोषण करणारा संबोधले आहे. कुरानात अल्लाहला “रब्बुल्‌आलमीन” म्हटले आहे. तद्वतच समस्त प्रेषितांनी व संतांनी अखिल मानव जातीला मृत्युचे स्मरण करुन दिले आहे. प्रत्येकाला मृत्यु अटळ असून मृत्यु पश्चात समस्त मानवजातीची गाठ ईश्वराशी, अल्लाहशीच आहे. तेथे प्रत्येकाला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागेल. कर्मांच्या आधारवरच प्रत्येकाच्या पारलौकीक जीवनाचे यशापयश अवलंबून असेल. समस्त पैगंबरांसह, साऱ्या संतांसह तुकोबांनी सुध्दा या बाबतीत समस्त मानव जातीला सावधान केले आहे. तुकोबा म्हणतात, “क्षणाक्षणा हाची करावा विचार । तरावया पार भवसिंधु ।। नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।” पैगंबरांनी (स.) म्हटले आहे, ” ही दुनिया मरणोत्तर जीवनाची शेती आहे.” कबीरांनी म्हटले, “बीज बोए बभूल के। आम कहाँसे पाए ।” तुकोबांनी म्हटले “पेरी कडु जिरे । मागे अमृत फळे ।।

अर्के वृक्षा केळी कैसे येती ।।”अर्थात, “जैसी करनी वैसी भरनी.”

“जे पेराल ते उगवेल.”

” दूध का दूध। पानी का पानी ।”

संत ज्ञानेश्वर

संत कबीर

संत सावता माळी

पैगंबरांच्या (स.) साहित्यातील एक घटना खूप बोधकारक आहे. एक भयंकर वणवा भडकलेला आहे (आतीशे नमरुद). एक चिमणी आपल्या चोचेने एक एक थेंब पाणी त्या वणव्यावर टाकत आहे. कोणीतरी तिला आश्चर्याने विचारले, “वेडे, या एवढ्या भयंकर वणव्याला तुझ्या एक थेंब पाण्याने काय फरक पडेल? चिऊताई मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर देते, “दिडशहाण्या, मला माहित आहे की माझ्या एक एक थेंबाने हा वणवा विझणार नाही. मात्र उद्या मृत्यूपश्चात जेव्हा मी भगवंता समोर उभी ठाकेल तेव्हा माझे नाव आग लावणाऱ्यांच्या ही नाही आणि तमाशा पाहणाऱ्यांच्याही नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट केलेले असेल. यासाठीच मी ही धडपड करीत आहे.” आज समाजात परस्पर घृणा व द्वेषाचा अग्नि भडकावण्यात येत आहे. मात्र हा जन्म घृणा व द्वेषासाठी नव्हे तर परस्पर प्रेम व सदभावना निर्माण करण्यासाठी आहे. या, आपण सर्व देशवासी मिळून समाजात परस्पर प्रेम, सद्भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करुयात.

निलेश लंके प्रतिष्ठाण व स‌द्भावना मंच अहमदनगर अॅड. संभाजी बोरुडे : 9422 74 0202 डॉ. सय्यद : 9423 16 1508

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button