टायटलविनाच (एखाद दुसरा अपवाद वगळून आज मात्र ‘सत्यशोधक’ शीर्षकाची काही नियतकालिके प्रसिद्ध होत आहेत. असो).

टायटलविनाच (एखाद दुसरा अपवाद वगळून आज मात्र ‘सत्यशोधक’ शीर्षकाची काही नियतकालिके प्रसिद्ध होत आहेत. असो). त्यामुळे सर्वांगी तळपणारी सत्यशोधक प्रतिमा झाकोळली गेली. संपूर्ण सत्यशोधकांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणाही थोडीशी मागे पडली. त्यामुळे सत्यशोधकांच्या परिचय लेखनाचे काम जिकिरीचे झाले असावे.
क्रांतिमाँ सावित्रीबाई फुले यांच्या अनुषंगानेही अशीच पुनरावृत्ती झाली. वास्तविक सत्यशोधक समाज स्थापनेपासून त्या समाजाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. १८७७ च्या दुष्काळात समाजाच्या वतीने स्थापलेल्या क्षुधानिवारण कॅम्पच्या त्या सर्वेसर्वा होत्या. पुढे जोतीराव निवर्तल्यावर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. १८९६ सालच्या दुष्काळात समाजाच्या वतीने पीडितांची सेवा केली. इतकेच नव्हे तर प्लेगची लागण झालेल्या बालरुग्णाची सेवा करता करता त्यांनी मृत्यूला कवटाळले.
असे असताना आजच्या जनसामान्यांसमोर देशातील पहिली शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका एवढीच प्रतिमा सीमित आहे. खरे तर त्या आद्यक्रांतिकारी भारतीय माँ आहेत. त्यांचे काव्यही या मुद्याला पूरक आहे. त्यांनी केशवसुतांच्या अगोदर क्रांतीची तुतारी आवेशाने फुंकली. मात्र, अर्वाचिन आद्य कवीचा मान केशवसुतांकडे गेला. याचे कारण काय ? सत्यशोधक जागर मंदावत राहिला. खरे तर १४० वर्षाच्या समाजाच्या इतिहासात त्या एकमेव स्त्री अध्यक्षा आहेत. ही बाब सावित्रीबाईंच्या अनुषंगाने उपेक्षित राहिली. तेव्हा या देदीप्यमान मूल्यांना दिग्दर्शित करण्यासाठी सत्यशोधकांच्या परिचयाची आवश्यकता नाही का?
सत्यशोधकांच्या चरित्राची जुळवाजुळव करीत असताना बरेचसे सत्यशोधक उतारवयात सत्यशोधक मत ग्रहण करते झालेले दिसतात. सत्यशोधक मतग्रहण करूनही काही सत्यशोधक वारकरी होते. शेवटपर्यंत काहींचे पंढरपूर, देहू, आळंदी सुटलेले नव्हते. काही प्रार्थनासमाजी, काही ब्राह्मोसमाजी, तर काही आयुष्याच्या शेवटच्या चरणात सनातनी धर्माकडे वळलेले. बहुतांश सत्यशोधक जेमतेम शिकलेले. थोडक्यात, सत्यशोधक मत अंगीकारूनही काही सत्यशोधक पूर्वाश्रमीच्या धर्माची पूर्णतः नाळ तोडू शकले नाहीत. सत्यशोधकांच्या परिवारानेही ही नाळ पूर्णतः तोडलेली नव्हती. बरेचसे सत्यशोधक श्री, ओम, पर्त कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी आणि अन्य तत्सम पा
आणत असत. त्यामुळे सत्यशोधकी जाणि
ची
गेल्यासारखी दिसते. मा. सुरेंद्र बारलिंगे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना मंडळामार्फत त्यांनी १९३८ मध्ये प्रसिद्ध आलेल्या पंढरीनाथ पाटलांच्या फुले चरित्राची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. प्रस्तुत ग्रंथ सत्यशोधक समाजाचे भूतपूर्व अध्यक्ष व्यंकटराव रणधीर यांनी बारलिंगे यांना उपलब्ध करून दिला, बारलिंगे यांनी ग्रंथात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मनोगतात, ‘माझे ‘परममित्र’ रणधीर यांनी ग्रंथ उपलब्ध करून दिला,’ असा उल्लेख केला. मात्र ‘सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व्यंकटराव रणधीर’ असा त्यांचा उल्लेख व्हायला हवा होता. तसा झाला नाही. याचाच अर्थ असा की, सत्यशोधकी जाणिवांचा जागर सर्वांगी भरून राहिला नाही. साहजिकच अ. ना. देशपांडे, कुसुमावती देशपांडे आदी लेखकांच्या विशिष्ट वैचारिक लेखणीतून सत्यशोधक लेखकांची सर्वांगीण झिरपण कशी व्हावी? मग हेच लेखनबांधणीचे कार्य सत्यशोधक लेखकाने, सत्यशोधकी जाणिवेने का करू नये?
खरे पाहता सत्यशोधक समाज संस्थापक जोतीराव फुले यांचा १८७२ साली प्रसिद्ध झालेला ‘गुलामगिरी’ ग्रंथ सत्यशोधक समाजाचा मॅनोफॉस्टो आहे. या ग्रंथाचा वारसा खऱ्या अर्थान काही अंशी सत्यशोधक दिनकरराव जवळकरांच्या ‘देशाचे दुश्मन’ पुस्तिकेने पुढे चालविला. सत्यशोधक कृष्णाजी कर्काजी चौधरी यांच्या ‘शेतकऱ्याचे दुःखोद्गार’ या १९०७ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तिकेने पुन्हा एकदा ब्राह्मण्यावर शेतकऱ्याचा असूड ओढला. जोतीरावांच्या अखंडांचा उतारा १९१३ साली सत्यशोधक मुकुंदराव पाटलांच्या ‘कुळकर्णी लीलामृत’ने पुन्हा समाजाला एकवार दिला. जोतीरावांचे सामाजिक आणि वाङ्मयीन कार्यकर्तृत्व अखंडपणे आजतागायत सत्यशोधक आपल्या शिरी घेऊन आहेत. ब्राह्मण्याने या पुरोगामी जोतीची सतत उपेक्षा केली. मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांनी सत्यशोधकी वाङ्मयाकडे प्रस्तुत दृष्टिकोनातून पाहिले नाही. जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या समवेत शेकडो सत्यशोधक लेखक आहेत याचे सर्वांगीण भानच आले नाही. परम महासंगणकाच्या जनकांनी ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ वेबसाईटवर टाकल्याची चर्चा ऐकतोय. आनंद आहे. हाच आनंद द्विगुणित होण्यासाठी सत्यशोधक आजोबांचे ‘शेतकऱ्याचे दुःखोद्गार’ या पुस्तकाची अधिक दखल घ्यावी ही विनंती.
खरेतर सत्यशोधकांची लढाई ब्राह्मण्याशी आहे. तथागतांपासून ही लढाई सुरूच आहे. मात्र पूर्णपणे ब्राह्मण्य संपलेच नाही. ब्राह्मण्याचा नायनाट केव्हाच


