मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
*
त्यास आपल्या जातीच्या वाटघाला आलेलाच व्यवसाय करणे भाग होते. त्यामुळे कारागीर जातीच्या प्रेरणा मारण्याचे काम जातिव्यवस्था करत होती. त्यांना स्वतःची जीविका चालविण्यासाठी शेतकरी जातीवर अवलंबून राहावे लागे. त्यांना मिळणारा मोबदला हा त्यांच्या कामाचे महत्व किंवा कामाची श्रम सघनता यावरून ठरत नव्हता तर जातिव्यवस्थेच्या उतरंडीत असलेल्या त्यांच्या स्थानावरून निश्चित होत होता. म्हणजे ब्राह्मणाच्या कामाचे स्वरूप कमी श्रमसघन व कमी महत्वाचे असले तरी त्यांना मिळणारा मोबदला सर्वाधिक होता. तर महारांच्या कामाचे स्वरूप आत्यंतिक श्रमसधन असूनही त्यांना दिला जाणारा मोबदला आत्यंतिक कमी होता (Klass १९८० : १३७), ह्या कारागीर जातींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गावात त्यांच्यापेक्षा दुकानदाराला अधिक मान होता. परिस्थितीमुळेच भारतीय कारागिरांमधून युरोपप्रमाणे भांडवलदार निर्माण होऊ शकले नाहीत (पाटील २००३ : १६९),
ब्राह्मणेत्तर जातींवर लादण्यात आलेल्या शिक्षणबंदीमुळे अस्पृश्य व कारागीर जाती त्यांच्याकडे असलेल्या ज्ञान व कौशल्याचे संस्थीकरण करू शकल्या नाहीत तसेच आपल्या कौशल्याचा विकास करू शकल्या नाहीत. अनेक शतके हीच स्थिती कायम राहिल्याने अस्पृश्य व कारागीर जातींची परिस्थिती गतानुगतिक बनली होती. ब्रिटीशांची भांडवली सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर किमान औपचारिक पातळीवर जातिव्यवस्थेच्या ब्राह्मणी धर्मनियमांचा अंमल कमी होऊन भांडवली कायद्याचा अंमल चालू झाला. ब्रिटिशांनी त्यांच्या शिक्षणधोरणात ब्राह्मणांच्या शिक्षणालाच प्राधान्य दिले तरी किमान ब्राह्मणेत्तरांच्या शिक्षणावर ब्राह्मणी धर्मकायद्यांनी लादलेली बंदी हटली आणि किमान औपचारिक पातळीवर सर्वांना शिक्षण खुले झाले. त्याचबरोबर अनुवांशिक म्हणजेच जातिगत व्यवसायांची सक्तीही दूर झाली. ब्रिटीश काळात घडून आलेल्या अशा बदलांनी इतिहासात पहिल्यांदाच ब्राह्मणेत्तर जातींना स्वविकासाच्या संधी सामूहिक पातळीवर प्राप्त झाल्या. अर्थात शिक्षणावरील पारंपरिक मक्तेदारी आणि ब्रिटीशांचे ब्राह्मणधार्जिणे धोरण यामुळे ब्रिटीश अंमलातही ब्राह्मणांचे वर्चस्व व प्रभुत्व अबाधितच राहिले.
ब्राह्मणांच्या प्रभुत्वाचा सामना करत ब्राह्मणेत्तर जातींना स्वतःचा विकास घडवून आणावयाचा असेल तर त्यांना विशेष सवलत वा मदत दिली गेली पाहिजे हे महात्मा फुलेंनी मांडले. त्यांनी प्रशासनाच्या सर्व ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मण प्रभुत्वाला पुढील अखंडांमधून अधोरेखित केले. सत्ता तुझी राणीबाई । हिंदुस्थानी जागृत नाही । जिकडे तिकडे ब्राह्मणशाही । डोळे उघडून पाही । कुणब्याची दाद
लादण्यात आला.
उपभोग व वापरापासून दलितांना
व वापरावर निर्बंध लादण्यात ऑल.
व उपभोग वस्खेवार ढकलण्यात आले. अस्पृश्यतेमुळे दलित जातींची श्रमशक्तीगतानुग
निम्नतम पारख्या व राजसत्तेच्या ताबेदारी खाली आली. वेठबिगारीचे श्रम दलितांच्यावर किमान
आबा स्वाभाविक व नित्यतेची बाब बनली (बगाडे २०११: १०). अशाप्रकारे शिक्षण
अस्पृश्यता आणि कनिष्ठ जाती विशेषतः दलित जातींना आर्थिक प्रगतीपासून शिक्षण
सुखण्यात आले. ते ब्राह्मणेत्तर व्यक्तींच्या उद्योगधंद्यांच्या प्रेरणा आणि शक्यता पातळ
भारत होते. शुद्धी अशुद्धीचे तत्वही दलित बहुजन जातींच्या आर्थिक प्रगतीला व्यवस
रोखण्याचे विशेषतः त्यांच्या व्यावसयिक प्रगतीमध्ये ते मोठे अडथळा ठरते (केतकर इतिह
-72
(ज्ञानकोश अ): ४६६), जातिव्यवस्था केवळ अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या जातींच्या आर्थिक व सामाजिक उन्नयनात अडथळा ठरत नव्हती तर ती कारू-नारू जातींच्या (कारागीर जाती/बलुतेदार जाती) उन्नयनामध्येही अडथळा निर्माण करत होती. ह्या कारागीर जातीवर अनुवांशिकतेणे वाट्याला आलेले व्यवसाय करण्याची सक्ती लादण्यात आलेली होती. म्हणजे एखाद्याची इच्छा दुसरा व्यवसाय करण्याची असली तरी **शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा *


