संत्रे कुंभार कुटूंबाला न्याय मिळवून देणारच..! मा. ना. वडेट्टीवारांची पत्रकार परिषद

संत्रे कुंभार कुटूंबाला न्याय मिळवून देणारच..! मा. ना. वडेट्टीवारांची पत्रकार परिषद
जालना जिल्ह्य़ातील जवखेडा येथील ओबीसी कुंभार कुटूंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व ओबीसी नेते प्रा श्रावण देवरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर जालना येथे पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज चढलेला आहे. गरीब कुटुंबांची जमीन बळकावण्यासाठी त्यांनी अनेकांची घरे उध्वस्त केली आहेत. संत्रे कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करु, असे स्पष्ट अभिवचन वडेट्टीवार यांनी दिले.
या प्रसंगी ओबीसी नेते प्रा श्रावण देवरे यांनी इशारा दिला की, संत्रे कुटूंबाला नुकसान भरपाई मिळावी व त्याच जागेवर त्याचे पुनर्वसन करण्यात यावे, अन्यथा सत्तेचा माज चढलेल्या धन-दांडग्यांना व जात-दांडग्यांना पुढील निवडणूकीत धडा शिकविल्याशिवाय हा ओबीसी आता शांत बसणार नाही.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा *
*


