*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण*

*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण*
डॉ. राजू जाधव
सोयरिकीत देशमुख, राजकारणात मराठा, आरक्षणात कुणबी (एक मराठी म्हण)
मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक चर्चाविश्वाच्या मध्यवर्ती आला आहे. ओबीसी-मराठा जनसमूहांमध्ये कमालीचा द्वेषभाव निर्माण होऊन जातीसंघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनोज जरांगे-पाटलांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा जातीच्या आंदोलनाने सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी लावुन धरली आहे. त्यांनी ही मागणी अटीतटीची केली असल्याचे आपण पाहतो आहोत. दुसऱ्या बाजूला ओबीसी जाती मराठ्यांना ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवित आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा असा हा सामाजिक संघर्ष जातीव्यवस्थेच्या अरिष्टाकडे निर्देश करत असला तरी शास्ता वर्ग या अरिष्टाचा उपयोग जातीसमूहांमध्ये तेढ निर्माण करत स्वतःची व्होट बैंक मजबूत करून निवडणुकांमध्ये जय मिळविण्याची पद्धतशीर व्यूहरचना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद, दोन्ही जनसमूहांच्या उच्चभ्रूची भूमिका, शास्त्या वर्गाचे धोरण आदि बाबींचा आपण थोड्या विस्ताराने सदरील लेखात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आरक्षणामागची भूमिका
आरक्षणाचे धोरण राबविणे हे काही फक्त भारताचे अनन्य वैशिष्ट्य नाही. इतर अनेक देशातही त्याचा स्वीकार व अंमलबजावणी केली गेलेली दिसून येते. ‘सकारात्मक कृती’ (Affirmative Action), राखीव जागांचे धोरण (Policy of Reserved seats) अशा नावांनी आरक्षणाचे धोरण ओळखले वा संबोधले जाते. स्थूलमानाने समाजविकासाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत जे जनसमूह मागास राहिले किंवा ज्यांना मागास ठेवले गेले, अशा जनसमूहांना विकासाच्या प्रक्रियेत
🔴 *शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 तीन बंधू न्यूज 💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴🔴*




