सोशल

विनम्र अभिवादन! सचिन भाऊसाहेब गुलदगड यांचे अपघाती निधन!

विनम्र अभिवादन!
सचिन भाऊसाहेब गुलदगड यांचे अपघाती निधन!

23 एप्रिल 2024 रोजी नाशिकहून मोटरसायकलीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सिन्नर जवळ नवीन पुलाचे काम चालू होते त्याचा डायव्हर्शन बोर्ड व्यवस्थित न दिसल्यामुळे मोटर सायकल मातीच्या ढिगार्‍यावरून बांधकाम चालू असलेल्या फुलाच्या कड्याला जोरदार धडक देऊन फुलाच्या चालू बांधकामाच्या गजानी अँगल चा जोरदार मार चेहऱ्यावर कपाळावर लागल्यामुळे अपघाती मृत्यू झाला.

सचिन भाऊ साहेब गुलदगड यांचा जन्म 14 सप्टेंबर 19 86 रोजी झाला होता त्यांचा मेडिकल दुकानाचा व्यावसाय अहमदनगर मध्ये होता सध्या ते एम आर चे ही काम करत होते अतिशय हुशार स्वावलंबी निर्भीड समाज प्रेमी होते कॉलेज जीवनापासूनच संघटनेची आवड होती २२ वर्षांपूर्वी त्यांनी संत सावतामाळी युवक संघटनेची स्थापना केली

[gspeech-button]

महाराष्ट्रभर युवकांना एकत्र करून अनेक चालीरीती रूढी परंपरा व्यसनापासून मुक्त करून त्यांना समाजसेवेचे उद्योगधंद्याचे धडे दिले अनेक आंदोलने केली सावता माळी यांच्या अरण तीर्थक्षेत्रास अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा विकास व्हावा सावता महाराजांच्या आरणगावी दरवर्षी यात्रेला सर्व तरुणांनी सावता महाराज यांच्या दर्शनाला जावे त्यांचे आचार विचार अंगीकृत करावे ही शिकवण त्यांनी प्रामुख्याने आपल्या तरुण मित्रांना दिली महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करत फुले दापत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा भारतातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आरक्षित करून सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करावे समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील

त्या त्या ठिकाणी धावून जाणे त्यांना मार्गदर्शन करणे मदत करणे इत्यादी कामे ते हिरीरीने करत होते अपुऱ्या साधन संपत्तीचा वापर करून जिद्दीने संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत होते ओबीसी वरील अन्याय अत्याचार जात निहाय जनगणना या विषयावर त्यांच सध्या काम चालू होते जो आवडतो सर्वांना तोची आवडतो निर्मिकाना या ईश्वर नियतीस इलाज नाही वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या पश्चात आई सुमित भाऊसाहेब गुलदगड वय 51-वडील भाऊसाहेब आप्पाराव गुलदगड वय 61 भाऊ संतोष भाऊसाहेब गुलदगड पत्नी सोनाली सचिन गुलदगड बीएससी बीएड वय 34 मुलगा सारण सचिन गुलदगड वय 12 सर्वेश सचिन गुलदगड वय 10 दोन मुले सातवी व पाचवी मध्ये नामांकित शाळेमध्ये शिकत आहेत

असा परिवार आहे घरातील कर्ता माणूस गेला त्यामुळे सध्या मुलांचे शिक्षण आणि उपजीविकेसाठी कोणतेही साधन उरले नाही त्यामुळे चिंताग्रस्त पत्नी आजारी अवस्थेमध्ये सलाईन लावून उपचार घेत होती आज पर्यंत लोकांना मदत करणारे घर नीतीने उध्वस्त केलं आणि आता आपणाला कोणी वाली उरला नाही या काळजीने आई-वडील मुलं पत्नी चिंताग्रस्त होती अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते शंकरराव लिंगे सुभाष राऊत सोलापूर यांनी त्यांच्या राहुरी जिल्हा अहमदनगर येथील राहत्या घरी जाऊन सचिन भाऊ साहेब गुलदगड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

पत्नी आई-वडील भाऊ मुले यांची विचारपूस केली त्यांना धीर दिला त्यांच्या पत्नीचे बीएससी बीएड शिक्षण झालेले आहे वय वर्ष 34 आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही योजनेतून एखादी सरकारी नोकरी देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आपण एकटे नसून आपल्या पाठीमागे सर्व समाज आहे त्यामुळे आपण ज्यादा घाबरून जाण्याचे कारण नाही काही ना काही मार्ग निघेल त्यामुळे चिंता सोडा आणि आहे त्या मुलांचे व्यवस्थित शिक्षण संगोपन करण्यासाठी प्रयत्न करावेत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एकटे पडू देणार नाही आम्ही आपल्या दुःखामध्ये सामील आहोत वेळोवेळी कोणत्याही अडचणीच्या वेळी फोन करा मदत करण्याचा प्रयत्न करू असे शंकरराव लिंगे म्हणाले शेवटी सचिन भाऊ गुलदगड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी चरणी प्रार्थना लिंगे यांनी केली यावेळी पाहुणेमंडळी नातेवाईक उपस्थित होती@# माळी ओबीसी बहुजन

, दीनबंधू शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button