सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग भाग सातवा

**सत्यशोधकाचे अंतरंग भाग सातवा

या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील एक सत्यशोधक प्रकरण पाहणे उद्बोधक ठरेल. नाशिक जिल्हयातील पिंपळगाव बसवंतचे एक 💐💐💐💐कडवे सत्यशोधक**
🙏🙏🙏🙏
गणपतराव दादा मोरे यांनी नाशिक जिल्हयात सत्यशोधक मताचा प्रचार आणि प्रसार केला. प्रचार-प्रसारासाठी सत्यशोधक शाहीर भीमराव महामुनींचे ‘भीमपुराण’ (सत्यशोधकी जलशा) १९०७ साली पिंपळगावी करविले. १९०८ साली दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथे एक सत्यशोधक मते विवाह लावला. शुक्रवार, दिनांक ५ एप्रिल १९१२ रोजी सावळाराम दगडूजी घोलप आणि मानाजी दगडूजी कांबळे आदी सत्यशोधकांच्या सहकार्याने दुसरे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरविले. इ. स. १९१३ साली वणीकर रावसाहेब थोरात आणि अन्य सहकाऱ्यांच्या समवेत अ. भा. मराठा Mostly परिषद नाशिक येथे घेतली.

सामान्य वाचक वंचित राहिला. त्यामुळे या अध्यक्षांची बहुआयामी कारकीर्द चित्रित करण्यात मर्यादा पडल्या, अशा प्रतिकूल वातावरणातही ना. भास्करराव जाधवांनी सातशे व्यक्तींची सूची तयार केली; मात्र ही सूची आज उपलब्ध नाही. सत्यशोधकांच्या माहितीच्या दस्तऐवजांच्या कमतरतेमुळे साहजिकच सत्यशोधकांचे अंतरंग शब्दबद्ध करण्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. आता मात्र एम. फिल. आणि पीएच. डी.च्या संशोधकांमुळे दिवंगत सत्यशोधकांना चांगले दिवस आले आहेत.

इ. स. १८७३ पासून ते २०१६ पर्यंत सत्यशोधकांनी सत्यशोधकी चळवळीत कार्यरत असताना हजारो सत्यशोधकी ग्रंथांची निर्मिती केली. ही ग्रंथनिर्मिती जवळपास स्वतःच्या हिमतीवर केली. सत्यशोधकी प्रकाशन आणि वितरण संस्थांची वानवा असल्यामुळे प्रस्तुत ग्रंथसंपदा संगोपित करता आली नाही. त्यांच्या बहुतांश वंशजांनी ही ग्रंथसंपदा वाऱ्यावर सोडली. काहींनी तर ती जाळून नष्ट केली. काहींनी लोखंडी पेट्यात बंदिस्त केली. त्याकडे अनेक वर्षे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे कालौघात हे सत्यशोधक वाङ्मय दुर्मिळ झाले. पुढे काही संशोधक म्हणवणाऱ्यांनी आपापल्या ग्रंथालयात दस्तऐवज बंदिस्त केले. त्यामुळे अस्सल साधनांची वानवा निर्माण झाली. त्यामुळे अस्सल दस्तऐवजाअभावी सत्यशोधक समाजाचा इतिहास, वाड्मयाचा इतिहास, सत्यशोधक चरित्रकोश लेखनाचे कार्य रेंगाळत राहिले. त्यामुळे सत्यशोधकांचे अस्सल सत्यशोधकी कार्य उपेक्षित राहिले.

सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मार्च आणि डिसेंबर १९२७ मध्ये महाड येथे मानवमुक्तीचा लढा लढला गेला. दुसऱ्या टप्प्यात तर विषमतेचे मूळ असलेल्या मनुस्मृती ग्रंथाचे जाहीर दहन करण्यात आले. सद्धर्माच्या महान क्रांतीचा हा प्रारंभ होता. या क्रांतीला सत्यशोधक ना. भास्करराव जाधव, रामचंद्र आसवले, विठ्ठलराव वंडेकर आदींनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर पाठिंबा दिला. सत्यशोधक जेधे जवळकरांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन केले. मनुस्मृती दहन कार्यक्रमप्रसंगी (२५-१२-१९२७) रात्रभर सत्यशोधकी जलशांनी प्रबोधनपर जागर केला. मात्र जलशाच्या कार्यक्रमाला

🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button