सोशल

जैन समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही,

जैन समाजाने परवा रविवारी एक चांगला निर्णय घेतला जैन समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही, आणि मग कालंच याचे अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका छपायची नाही तर फक्त whatsapp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे
खास निर्णय म्हणजे प्रि- वेडींग व संगीत सद्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे
वरील दोन्ही समाज (जैन व अग्रवाल ) आर्थिक दृष्ट्या भक्कम असून देखील त्यांनी वरील निर्णय घेतले, त्या बद्दल दोन्ही समाजाचे अभिनंदन

आपण ओरिजनल ओबीसी एससी एसटी कधी बदलणार, आपण साखरपुड्याचा खर्च लग्नाएवढा करायला लागलो आहोत, वेळ प्रसंगी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करतो, आता आपण बदलेले पाहिजे हे नक्की.
नोट :- आदर्श व अनुकरणीय निर्णयाचे मनापासून स्वागत करा . आणि सर्व जाती धर्म पंथ यांनी या निर्णयाचे सर्वांनी पालन करा .

समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे.

काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने लक्षात आली होती,परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु उधळू लागले.
आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत .आतातरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही.

१)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे.
२) शेती मालाला भाव नाही.
३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत.
४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही.
५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो.
६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरतो आमच्या काही पिढ्या गेल्या.आता तरी डोळे उघडले पाहिजेत.
७) विवाह हा सोहळा नाही तर तो ‘ संस्कार ‘ आहे .१६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.
८) कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात.आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही
९) आपण शेती विकून गुंठ्यावर आलो, तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करत आहे. व्यापारीवर्गाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे.
१० ) इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे.
११) भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको.
१२ ) वर-वधू यांना नेहमीच उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे.
१३) वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे. सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे.
१४) जेवणावळी, मानपान ही पद्धत बंद करून खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.
१५) संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच.
१६) मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी.स्वागत समारंभात साधेपणा आणावा. विवाहासाठी सत्यशोधक विवाह पद्धती वापरावी
१७) क्रिकेट ५ दिवसाचा, वन-डे वरुन २० – २० वर आला.तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ?
१८) मोजक्याच लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो.
१९) लग्न पत्रिकेचा खर्च वाचून लग्नपत्रिका व्हाट्सअप वरून पाठवावी व संबंधित व्यक्ती पत्रिका पाठवल्यानंतर फोन करून आग्रहाचे निमंत्रण द्यावे पुन्हा आठवणीसाठी फोन परत लग्नाच्या अगोदर दोन दिवस करावा
२०) कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केलाच पाहिजे .

२१) समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.
चला तर मग सुधारणांची सुरुवात स्वतः पासून करुयात ! हळूहळू सर्व समाज बदलेल व एक दिवस समाजाची १००% प्रगती होईल !

फक्त वाचू नका….!
विचारही करा….!
(समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत हा मेसेज पोहचवा.)
🙏🏻ही नम्र विनंती.
💯हि काळाची गरज आहे.

🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡 या सर्वाला सर्व सहा तासात सत्यशोधक विवाह संपन्न होतो त्यामध्ये साखरपुडा हळदी समारंभ लग्नाचा समारंभ आणि जेवणावर सर्व सहा तासात पूर्ण होतात एकाच दिवशी सत्यशोधक पद्धती सर्वात उत्तम या विवाह मध्ये हुंडा देणे घेणे नाही आहेर देणे घेणे नाही भेटवस्तू देणे घेणे नाही एकदम साध्या पद्धतीने लिमिटेड लोकांमध्ये हा विवाह केला जातो कमीत कमी खर्चात हा विवाह होतो आणि हा विवाहाची पद्धत महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिखित सार्वजनिक सत्य धर्माच्या पुस्तकात विधी पद्धती मंगलाष्टका शपथविधी सर्व त्याच्या मध्ये दिलेल्या आहे सर्वांनी याचा उपभोग घ्यावा माहिती पाहिजे असेल तर मला केव्हाही फोन करावा सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 💐💐💐💐💐💐

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button