🔥 बुलढाणाच्या घाटाखालील भागात अखिल भारतीय माळी महासंघाची दमदार संघटनात्मक बांधणी; वासुदेव राजनकर व मोहन बोपले यांच्या निवडीने जातनिहाय जनगणना चळवळीला नवी ताकद! 🔥

🔥 बुलढाणाच्या घाटाखालील भागात अखिल भारतीय माळी महासंघाची दमदार संघटनात्मक बांधणी; वासुदेव राजनकर व मोहन बोपले यांच्या निवडीने जातनिहाय जनगणना चळवळीला नवी ताकद! 🔥
बुलढाणा | दि. १६ जुलै :
अखिल भारतीय माळी महासंघाने बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मा. वासुदेव राजनकर (खेर्डा बु., ता. जळगाव जामोद) यांची बुलढाणा जिल्हा सचिव (घाटाखालील) तर मा. मोहन बोपले (ग्रामपंचायत सदस्य, पातुर्डा बु., ता. संग्रामपूर) यांची संग्रामपूर तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती मा. शरदभाऊ बनकर (अमरावती विभाग अध्यक्ष), मा. अॅड. राजेंद्रकुमार भास्करराव पल्हाडे (अमरावती विभाग उपाध्यक्ष), मा. विष्णुभाऊ इंगळे (बुलढाणा जिल्हाध्यक्ष – घाटाखालील) आणि मा. विजय राजाभाऊ खरात (बुलढाणा जिल्हाध्यक्ष – घाटावरील) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
या निवडीबद्दल मा. शंकरराव लिंगे (राष्ट्रीय अध्यक्ष), मा. रमेशभाऊ हिरळकार (विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष), मा. गौतमजी क्षिरसागर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष), मा. अभय तायडे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), मा. राजेश द. मेहेत्रे (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), मा. हारीभाऊ राजनकर (बुलढाणा जिल्हा कार्य मार्गदर्शक), मा. नानासाहेब पाटील (जिल्हा संघटक – घाटाखालील), मा. सरला ताई काळे (जिल्हाध्यक्षा महिला आघाडी – घाटाखालील), मा. प्रिती विशाल खंडारे (जिल्हाध्यक्षा महिला आघाडी – घाटावरील), मा. गजानन हिरळकार (जिल्हा उपाध्यक्ष – घाटाखालील), मा. साहेबराव बोदडे, मा. विलास मसने, मा. संजय दाते, मा. विलास खाडे, मा. विजय सातव, मा. गणेश वानखडे, मा. मुकुंदा माळी आणि मा. गणेश जनार्दन बोबडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात अखिल भारतीय माळी महासंघाची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे विचार गावागावात पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाईल. तसेच जातनिहाय जनगणना ही सामाजिक न्यायासाठी अत्यावश्यक असून, तिच्या समर्थनार्थ प्रत्येक गावातून ग्रामपंचायतींचे ठराव करून ही चळवळ केंद्र व राज्य सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येईल.
📲 आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये संपर्क क्रमांक : 73 87 37 78 01 जोडा.
👍 बातमी लाईक करा | 🔄 शेअर करा | ▶️ सबस्क्राइब करा | 📤 फॉरवर्ड करा | 💬 कमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
📢 ‘दिनबंधू न्यूज’ व्हॉट्सअॅप चॅनल आजच फॉलो करा.






