मोताळ्यात OBC एल्गाराची रणशिंगे! मुकुंदा माळी तालुकाध्यक्ष; जातनिहाय जनगणना, प्रलंबित मागण्यांसाठी निर्णायक लढा आणि महात्मा फुले यांना ‘राष्ट्रपिता’, सावित्रीबाई फुले यांना ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे आक्रमक मागणी! 🔥

🔥 मोताळ्यात OBC एल्गाराची रणशिंगे! मुकुंदा माळी तालुकाध्यक्ष; जातनिहाय जनगणना, प्रलंबित मागण्यांसाठी निर्णायक लढा आणि महात्मा फुले यांना ‘राष्ट्रपिता’, सावित्रीबाई फुले यांना ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे आक्रमक मागणी! 🔥
अखिल भारतीय माळी महासंघाच्या मोताळा तालुका अध्यक्षपदी मा. मुकुंदा परशराम क्षीरसागर (मुकुंदा माळी), मु.पो. धामणगाव बढे, ता. मोताळा, जि. बुलडाणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मोताळा तालुक्यात OBC चळवळीला नवे नेतृत्व मिळाले असून, सामाजिक न्यायासाठी आक्रमक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, प्रदेश अध्यक्ष तथा विश्वस्त मा. गौतमजी क्षीरसागर, प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी मा. सौ. वसुधा रामकृष्ण येनकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. अभय तायडे, अमरावती विभागीय अध्यक्ष मा. शरदभाऊ बनकर, बुलडाणा जिल्हाध्यक्ष (घाटावरील) मा. विजय राजाभाऊ खरात, जिल्हाध्यक्ष (घाटाखालील) मा. विष्णुजी इंगळे, जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी मा. सरला चंद्रशेखर काळे, बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष (घाटाखालील) मा. साहेबराव बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष (घाटाखालील) मा. विलास तुकाराम मसने, जिल्हा संघटक मा. नानासाहेब पाटील आणि बुलडाणा तालुका अध्यक्ष मा. राजेंद्र उत्तमराव पवार यांनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष मुकुंदा माळी यांनी स्पष्ट इशारा दिला की, मोताळा तालुक्यात OBC समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी गावोगावी जनजागृती, पत्रक वाटप, निवेदन मोहीम आणि संघटनात्मक लढा उभारण्यात येईल. प्रत्येक ग्रामपंचायतीने जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, यासाठी व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच OBC समाजावरील अन्याय-अत्याचारांविरोधात तहसील कार्यालयांवर निवेदने देऊन संघर्ष तीव्र करण्यात येईल.
याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘राष्ट्रपिता’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘राष्ट्रमाता’ हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान केंद्र सरकारने जाहीर करावा, या मागणीसाठी राज्यव्यापी जनआंदोलन आणि निवेदन मोहीम उभारण्यात येणार असल्याची ठाम घोषणा करण्यात आली.
या घोषणेमुळे मोताळा तालुक्यात OBC समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नवनियुक्त तालुकाध्यक्षांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
✍️ संपादकीय संदेश
समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित संघर्ष हाच परिवर्तनाचा मार्ग आहे. OBC समाजाच्या प्रलंबित मागण्या, जातनिहाय जनगणना आणि महात्मा फुले–सावित्रीबाई फुले यांना राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्यासाठी लोकशक्ती एकवटणे ही काळाची गरज आहे.
दिनबंधू न्यूज | शिव क्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01
हा नंबर आपल्या सोशल मीडिया व WhatsApp ग्रुपमध्ये जोडा. बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल फॉलो करायला विसरू नका.
#दिनबंधून्यूज # शिव क्रांतीटीव्ही #अखिलभारतीयमाळीमहासंघ #मोताळा #OBC #जातनिहायजनगणना #महात्माफुले #सावित्रीबाईफुले #राष्ट्रपिता #राष्ट्रमाता #सामाजिकन्याय #बुलडाणाही






