सोलापूर

माळशिरसच्या नेतृत्वाला नवी दिशा! अखिल भारतीय माळी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी शंकर महादेव ढगे सर यांची दमदार निवड; ओबीसी हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र होणार!

🚩 माळशिरसच्या नेतृत्वाला नवी दिशा! अखिल भारतीय माळी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी शंकर महादेव ढगे सर यांची दमदार निवड; ओबीसी हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र होणार!

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

 

माळशिरस तालुक्यातील कनेरी येथील शिक्षकी पेशातील, सामाजिक बांधिलकी जपणारे तरुण नेतृत्व शंकर महादेव ढगे सर यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

गेल्या अनेक दशकांपासून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी माळशिरस तालुक्याला आपली कर्मभूमी मानून शाखाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रदेश प्रभारी आणि राष्ट्रीय अध्यक्ष या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत संघटना राज्यभर मजबूत केली. त्याच कार्यभूमीत आता शंकर महादेव ढगे सर यांच्यासारखे सक्षम नेतृत्व पुढे येत असल्याचा मनस्वी आनंद त्यांनी व्यक्त केला.

 

ढगे सर यांच्या निवडीस प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षीरसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर, कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिराळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष तथा विश्वस्त अमर बोराटे सर (श्रीगोंदा, अहिल्यानगर), विश्वस्त भीमराव कोथिंबीर, खजिनदार संजय इनामदार तसेच राष्ट्रीय सरचिटणीस पी. माळी सर यांनी मान्यता देत त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. अमोल वाघमोडे यांनीही अभिनंदन केले

 

निवडीनंतर बोलताना शंकर महादेव ढगे सर यांनी सांगितले की, जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाच्या न्याय्य मागण्या, अन्याय-अत्याचाराविरोधात संघर्ष, गावागावांत जनजागृती, ग्रामपंचायतींकडून जातनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करून ते राज्य व केंद्र शासनाकडे पाठविण्याची मोहीम, तसेच युवक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा उभारला जाईल.

 

ढगे सर यांच्या नेतृत्वामुळे माळशिरस तालुक्यात सामाजिक न्यायाच्या चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

 

✍️ संपादकीय संदेश

 

संघटना केवळ पदांवर चालत नाही; ती विचार, संघर्ष आणि जनसेवेवर उभी राहते. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा, हीच काळाची गरज आहे. नव्या नेतृत्वाने संघर्षाची परंपरा अधिक सक्षमपणे पुढे न्यावी, हीच अपेक्षा.

 

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📱 ७३८७७३७८०१

 

➡️ हा नंबर आपल्या सोशल मीडिया व व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा.

➡️ बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

➡️ दिनबंधू न्यूजचे व्हॉट्सअॅप चॅनेल आजच फॉलो करा.

 

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #शंकरमहादेवढगे #अखिलभारतीयमाळीमहासंघ #माळशिरस #कनेरी #ओबीसी #जातनिहायजनगणना #सामाजिकन्याय #सत्यशोधकशंकररावलिंगे #सोलापूर #महाराष्ट्रआ

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button