सोलापूर

पाथरूट चौकातील दलित कुटुंबांवर अन्याय; जागा बिल्डरांच्या घशात, न्यायासाठी २ जुलैपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा! 🔥

🔥 पाथरूट चौकातील दलित कुटुंबांवर अन्याय; जागा बिल्डरांच्या घशात, न्यायासाठी २ जुलैपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा! 🔥

 

सोलापूर : पाथरूट चौक परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे १५ दलित कुटुंबांना बेदखल करण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप युवा भीम सेना यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून संबंधित जागा जी.एम. ट्रेडर्स, प्रा. गुलाम दस्तगीर मेहबूब शेख यांना पार्किंगसाठी देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

 

निवेदनानुसार, या जागेवर अनेक वर्षे राहणाऱ्या रहिवाशांकडून नियमितपणे भाडे वसूल करण्यात आले. मात्र आता त्यांची घरे पाडून त्याच जागेवर पार्किंग उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित ठिकाण टी.पी. १, एफ. प्लॉट क्र. ३८ जवळ वळणावर असल्याने येथे पार्किंग झाल्यास मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.

 

या पार्श्वभूमीवर दलित कुटुंबांना त्याच जागेवर भाडे तत्त्वावर जागा द्यावी, अन्यथा २ जुलै २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे गेट येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

 

✍️ निवेदनावर स्वाक्षरी करणारे उपोषणकर्ते :

वनमाला कदम

नगमाना कदम

सुनीता वाघमारे

माया मोरे

लक्ष्मी वाघमारे

इंद्राबाई कांबळे

 

🖊️ संपादकीय संदेश

 

दलित, गरीब आणि वंचित कुटुंबांच्या हक्कांवर गदा आणून विकासाच्या नावाखाली अन्याय होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. प्रशासनाने संबंधित नागरिकांचे म्हणणे ऐकून कायदेशीर आणि न्याय्य तोडगा काढणे ही काळाची गरज आहे.

 

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

 

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

 

📲 ७३८७७३७८०१ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.

 

👍 बातमी लाईक करा

↗️ शेअर करा

▶️ सबस्क्राईब करा

📤 फॉरवर्ड करा

💬 कमेंट करा

🔔 बेल आयकॉन दाबा

📢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल फॉलो करायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button