राजकारण

एससी एसटी ओबीसी सर्व आरक्षण धारकाची धोक्याची घंटा वाजलेली आहे

एससी एसटी ओबीसी सर्व आरक्षण धारकाची धोक्याची घंटा वाजलेली आहे सर्व मागासवर्गीय सर्व आदिवासी सर्व ओबीसी ओरिजनल सावधान! सावधान!! सावधान!! जरांगेची मस्ती खूप वाढलेली आहे गर्व खूप वाढलेला आहे भाषा खूप खराब झालेले आहे जीभ खूप लांब झाली आहे गर्व खूप अहंकार जादा झाला आहे आरक्षणाच्या तमाशातला राजा झाला आहे हा मुद्दा संपल्यानंतर तंबाखू मागून खाऊ लागेल यात शंका नाही जरांगेच्या बापाच्या पेक्षाही जास्त वयाच्या माणसाला अरे तुरे कारे म्हणतो ही त्याची संस्कृती आहे जरांगेचे बिगर इंजिनचे रेल्वेचे डबे आहेत त्याला कुठलाही ब्रेक नाही उतरायला लागला की तो कुठे जाईल कुठे जाऊन कुठल्या दरीत कोसळेल कुठे धडकेल कुठल्या समुद्रात पडेल कुठे जाऊन डुबेल कोणाला बुडवेल कुणाचा अक्सिडेंट करेल याचा पत्ता नाही पण नक्की आहे की तो मराठा समाजाला बुडवल्याशिवाय राहणार नाही मराठा समाजाचा राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही गर्वाचे घर नेहमी खाली आमदारांना चेपलानी मारा म्हणतो बिगर मिठाचा बिगर कांद्याचा खर्डा खाऊन मुंबई घाण करणार म्हणतो हा घाणेरडा सरकारने मुंबईला येण्यापासून रोखला पाहिजे सरकारचाही कार्यक्रम करतो म्हणतो सरकार चार टक्के च्या मराठा समाजावर निवडून आला असं म्हणतो त्याला गणित येत नाही गणितात फार कच्चा माणूस आहे त्याचा मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये 17 पक्षात आहे याची माहिती कुठे आहे त्याला कारण शिक्षण कमी असल्यामुळे माहिती कमी असते खेड्यात चवली पावली चिल्ल खुर्दा उधळल्यासारखा शब्द फेकतो शहाण्याचे चाकर व्हावे पण तो येड्याचे मालक होऊ नये मराठा समाजाची मुले जाणकार वयस्कर सुद्धा ही येड्याचे मालक झालेले आहेत बुद्धिवंत राजकारणी मूग गिळून गप्प बसले आहेत त्याचे परिणाम काय होतील युवकांना चुकीची माहिती दिल्यामुळे युवक भरकट जाण्याची शक्यता आहे याला जबाबदार फक्त जरांगे !
मराठा समाजाच्या आमदार खासदारांचाही कार्यक्रम करतो म्हणतो नातेसंबंधात आरक्षण द्या म्हणतो आणि एससी एसटी चा आणि ओबीसीचं आरक्षण संपवा म्हणतो आणि हे सगळं आरक्षण संपल्यानंतर एससी एसटी ओबीसी गप बसतील असं त्याला वाटतं हे शक्य आहे का? एक मात्र शक्य आहे की जरांगे हा मराठा समाजाचा आरक्षण खोट्या नाट्या प्रकारे काही दिवस मिळवणार परंतु मराठ्यांचा राजकारण कायमस्वरूपी संपवणार हे शक्य आहे! हेच सरकारचे ध्येय आहे मूळ प्रश्न आहे केजी ते पीजी शिक्षण मोफत झाले पाहिजे आरोग्य दवाखाना मोफत झाला पाहिजे शेतीला विज बी बियाणे खते पाणी मोफत मिळाले पाहिजे कर्ज बिनव्याजी मिळाले पाहिजे हामी भाव मिळाला पाहिजे खाज गी करण थांबविले पाहिजे खाजगीकरणात आरक्षण लावले पाहिजे सरकारी नोकरी प्रमाणे खाजगी नोकरीत सोयी सुविधा योग्य पगार पाहिजे कायमस्वरूपी निर्यात बंदी उठवली पाहिजे जुनी पेन्शन योजना पूर्ववत झाली पाहिजे अग्निवीर भरती बंद करून पूर्ववत सैन्य भरती झाली पाहिजे या गोष्टीवर आंदोलन केले असते तर भारताची सर्व सर्व जनता आंदोलनात उतरली असते पण या दीड शहाण्याला कोणी सांगावं पातळ सेनावर दगड टाकून घाण अंगावर कोण घेणार?

*“आरक्षण मिळूदे दाखवतो, खूप दिवस झालं तुझी” एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचा भुजबळांना इशार

बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‘येवल्याचा येडपट’ म्हणत हल्लाबोल केला. एकदा आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो. खूप दिवस झालं तुझी फडफड चालू आहे, असं एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.
जरांगे-पाटील म्हणाले, “कुणी म्हणत हॉटेल जाळलं, घरे जाळली. पण, शांततेत असलेल्या मराठ्यांवर खोटा डाग लावला गेला. यांनी यांचेच हॉटेल जाळले. निष्पाप तरूणांना गुंतवण्याचं काम सरकारनं केलं. मात्र, मराठ्यांना शांतता हवी आहे.
“येवल्याच्या येडपाटानं बीडमधील पाहुण्याचं हॉटेल जाळलं. सरकारही भुजबळांचं ऐकत आहे. छगन भुजबळ आता ‘जरांगे साहेब’ म्हणत आहेत. भुजबळांना समज दिल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. मी गप्प बसलो. नंतर मी म्हाताऱ्याला काहीही बोललो नाही. आता येडपट माझी शाळा काढत आहे. याला कुणी मंत्री केलं? हा महाराष्ट्राचा कलंक आहे,” अशी टीका जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांवर केली आहे
सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्याविरोधात भूमिका घेऊन आरक्षणात आडकाठी आणणार असाल, तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगेंची मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा; केली

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटण्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत. त्यांना आडवून दाखवा असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना संयम बाळगावा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांना केले आहे.
मुख्यमंत्री संवाद साधला. आहे, क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला न्यायालय ऐकणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकीलांची फौज सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचे काम वकिलांची फौज करेल. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखणं महत्वाचे आहे.

याचबरोबर, “राज्यात कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे. सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे की, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटतं मराठा आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कुणीही घाईगडबडीने निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा,” असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह मराठा समाजाला केले आहे.
*काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?*
आरक्षणासाठी सरकारने सुरूवातीला तीन महिने, ४० दिवस नंतर आता २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला. परंतू काहीच निर्णय घेतला नाही. मग आम्ही कुठपर्यंत थांबणार? आम्हालाही मर्यादा आहेत. परंतू आता सहनशिलता संपली आहे. त्यामुळे तयारीला लागा. २० जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटायला राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा? असे म्हणत सरकाला इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघारी येणार नाही, असेही त्यांनी सांगितले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये आज पर्यंत दहा हजार पाचशे तीस कुणबी नोंदी सापडल्या आहेत असे अधिकृत जाहीर केले आहे म्हणजेच डोंगर पोखरून उंदीर काढला आहे यामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होऊन मराठा समाजाच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे अनेक याचिका हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यामुळे या नोंदी किती खऱ्या किती खोट्या 2004 पासून नंतरच्या आजपर्यंतच्या नोंदीला स्थगिती येऊ शकते त्यामुळे हे आंदोलन सपशेल फेल गेले असल्याचे दिसत आहे
* मराठा आरक्षणा संदर्भातील क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली आहे. येत्या २४ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.
१२ वाजून २३ मिनिटाला याबाबत न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे, अशी माहिती मराठा आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी X वर पोस्ट करत दिली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मे २०२१ मध्ये न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. या क्युरेटिव्ह याचिका मुख्यमंत्री महाराष्ट्र विरुद्ध जयश्री लक्ष्मण पाटील आणि विनोद पाटील विरुद्ध जयश्री लक्ष्मण पाटील अशा आहेत. या याचिकांवर आता न्यायालय काय निर्णय घेणार हे महत्वाचे असणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यासमोर ही सुनावणी होईल
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. यापुर्वीची सुनावणी ६ डिसेंबरला झाली होती. २४ जानेवारीलाच या संदर्भातील निकाल लागू शकतो असेही सांगितले जात आहे.
*मराठा आरक्षण प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली होती. ६ डिसेंबरनंतर या याचिकेवर २४ जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होईल. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असतानाच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.* दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button