सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः47

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः47
संदर्भ – १. सहावे सत्यशोधक संमेलन सातारा, स्मरणिका- प्रा. अरुण शिंदे यांचा लेख, २. दीनमित्र अंक ३१ मे १९२२
कुळकर्णी सीताराम वामन
कट्टर सत्यशोधक कुळकर्णी सीताराम वामन यांच्या अनुषंगाने सत्यशोधक दस्तऐवजांमध्ये फारशी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. असे असले तरी त्यांचा जन्म १८७० सालचा असावा आणि ते पुणेकर सत्यशोधक असावेत, यशवंतराव फुले यांचे ते मित्र होते. सीताराम कुळकर्णी हे नोकरीनिमित्त पूर्व आफ्रिकेतील नैरोबी येथे काही वर्षे वास्तव्यास होते. ते बहुधा ब्रिटिश सैन्यात वैद्यकीय सेवेत असावेत. सीताराम वामन कुळकर्णी यांच्या अनुषंगाने सत्यशोधक दस्तऐवजामध्ये पहिला उल्लेख सापडतो तो १४ सप्टेंबर १८८६ रोजी त्यांनी लिहिलेल्या निबंधात. ठाणे येथील सत्यशोधक शाखेने सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त एका निबंधमालेचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने दीनबंधु पत्रातून जाहिरातही प्रसिद्ध केली होती. या जाहिरात प्रसिद्धीनंतर सत्यशोधक सीताराम कुळकर्णी यांनी ‘ब्राह्मण, इतर लोकांस यजमान, धनी, पालनकर्ते वगैरे विशेषणे देऊन हक्काने दानधर्म घेतात व त्यावेळी मोठमोठाले आशीर्वादही देतात, तेव्हा आम्हा इतर लोकांबरोबर एकंदर ब्राह्मण जातीचे वर्तन कसे असले पाहिजे? हल्ली त्यांचे वर्तन कसे आहे? व ते त्यांचे वर्तन उभय पक्षास श्रेयस्कर आहे काय?’ या विषयावर सत्यशोधकी मते चिकित्सापर एक निबंध लिहिला. हा निबंध ठाणे सत्यशोधक समितीच्या पसंतीला उतरला. पुढे हा निबंध दीनबंधुकार नारायण लोखंडे यांनी सत्यशोधक निबंधमाला अथवा हिंदू धर्माचे खरे ज्ञान (भाग २) या शीर्षकाखाली १८८७ सालच्या मे महिन्यात प्रसिद्ध केला.
पुढे २२ जानेवारी १८९३ रोजी ‘दीनबंधु’कार वासुदेवराव लिंगोजी बिर्जे आणि तानुबाई बिर्जे (ठोसर) यांचे वेताळ पेठ, पुणे येथील देवेज्ञ मंडळीच्या धर्मशाळेत सत्यशोधक मते विवाह झाला. सत्यशोधक घनश्यामभाऊ भोसले यांनी या विवाहाचे पौरोहित्य केले. या प्रसंगी आरंभीची तीन सत्यशोधकी मंगलाष्टके सीताराम कुळकर्णी
सत्यशोधकांचे अंतरंग / ७६
आणि यशवंतराव फुले यांनी म्हटली. या विवाहापूर्वी यशवंतराव फुले यांचा ४ फेब्रुवारी १८८९ रोजी राधाबाई ग्यानोबा ससाणे यांच्याशी सत्यशोधक मते विवाह संपन्न झाला. मित्राच्या या विवाहाला सीताराम कुळकर्णी उपस्थित असावेत.
यानंतर १७ एप्रिल १९११ रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन स्वामी अय्यावारू यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झाले. प्रस्तुत अधिवेशन नियोजित वेळेनुसार खेड (राजगुरुनगर) ऐवजी पुणे येथे वर्षभराच्या विलंबाने आयोजित झाले. या वर्षभरात अनेक सत्यशोधकांनी अधिवेशनासंदर्भात आपापली मते सत्यशोधकी नियतकालिकांमधून मांडली. या चर्चेत सीताराम कुळकर्णीही नैरोबी येथून पत्राच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या पलीकडे त्यांच्या सत्यशोधकी कार्याची माहिती हाती लागत नाही.
संदर्भ- १ ब्राह्मण आणि बहिष्कार – मो. तु. वांखडे, २. रा. ब. नारायण मेघाजी लोखंडे – डॉ. मा. गो. माळी, ३. दीनबंधु अंक-२९-१-१८९३
कुळकर्णी यशवंत मुकुंद
जन्म सुमारे १८८४)
यशवंत मुकुंद कुळकर्णी हे मौजे चिखर्डे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म सुमारे १८८४ साली झाला असावा. त्यांचे शिक्षण मराठी ५वीपर्यंत झाले. ते चिखर्डे येथील वतनदार कुळकर्णी होते. बार्शी तालुक्यातील कारी येथे ऐन तारुण्यात ते तलाठी होते. कारी येथील वास्तव्यात त्यांच्यावर सत्यशोधक मताचा प्रभाव होऊन ते सत्यशोधक चळवळीकडे आकर्षिले गेले. चिखर्डे येथील गावकऱ्यांनी ब्राह्मणबंधूवर काही दिवस बहिष्कार टाकला होता. या प्रसंगी बहुतांश ब्राह्मण कुटुंबांनी बाशी येथे स्थलांतर केले होते. मात्र यशवंत कुळकर्णी यांचा परिवार या प्रसंगी चिखर्डे येथेच राहिला. गाव वास्तव्यावरून ते कडवट सत्यशोधक होते, असे दिसते.
संदर्भ – सत्यशोधक ज्ञानेश्वर ढावरे, उस्मानाबाद यांचे टिपण
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


