महाराष्ट्र

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षात राजापूर येथे सत्यशोधक पद्धतीने स्तुत्य दशक्रिया विधी संपन्न

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षात राजापूर येथे सत्यशोधक पद्धतीने स्तुत्य दशक्रिया विधी संपन्न

गार्डे परिवाराचा समता, विज्ञाननिष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश

राजापूर (ता. खटाव, जि. सातारा) : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षात राजापूर येथील गार्डे परिवाराने सत्यशोधक विचारांना कृतीत उतरवत श्रीमती सुलाबाई नारायण गार्डे यांच्या दशक्रिया विधीचे आयोजन सत्यशोधक पद्धतीने करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. समता, विवेक, मानवता आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.

शनिवार, दि. ३० मे रोजी पार पडलेल्या या विधीमध्ये श्रीमती सुलाबाई गार्डे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अस्थी व राखेचे संकलन करून पर्यावरणपूरक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. उर्वरित राख व अस्थी वृक्षारोपणासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात विसर्जित करून त्यावर पिंपळ, वड आणि आंबा या वृक्षांची लागवड करण्यात आली. मृत व्यक्तीच्या स्मृती जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

सत्यशोधक विधीचे संचालन भीमराव कोथिंबिरे यांनी केले. त्यांनी महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज आणि सार्वजनिक सत्यधर्माच्या तत्त्वांनुसार सर्व विधी पार पाडले. यावेळी त्यांनी सत्यशोधक चळवळीमागील सामाजिक, वैज्ञानिक आणि मानवतावादी विचार उपस्थितांना समजावून सांगितले.

महात्मा फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ ही जातिभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांड याविरोधातील परिवर्तनवादी चळवळ होती. समाजात समता, बंधुता, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि विवेकनिष्ठ विचार रुजविण्याचे कार्य या चळवळीने केले. त्याच विचारांचा वारसा जपत गार्डे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला.

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षात राबविण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम राजापूर व परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरत असून सर्व स्तरांतून त्याचे स्वागत होत आहे. वामनराव गार्डे, चंद्रकांत गार्डे, बबन गार्डे, सुभाष गार्डे आणि संपूर्ण गार्डे परिवाराने घेतलेला हा पुढाकार सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

यावेळी दशरथ घनवट गुरुजी, शिवाजी घनवट (माजी सरपंच), गजानन घनवट (माजी ग्रामपंचायत सदस्य), रणजीत घनवट (माजी ग्रामपंचायत सदस्य), धनंजय काळोखे (शासकीय अधिकारी), सुभाष घनवट (मुंबई पोलीस), जगन्नाथ शिंदे, विजय बोराटे, राजेंद्र करणे, ज्ञानेश्वर महाजन, चंद्रकांत चौरे, सहदेव लोखंडे, दत्ताशेठ राऊत (वाशी, नवी मुंबई), शारदा जठार, सीमाताई गार्डे (सामाजिक कार्यकर्त्या, इंदापूर), सुधीर गोरे, संजय बाबा करपे, अजित जाधव (संयोजक, महात्मा फुले विचार अभियान), फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच राजापूर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपर्क :
भीमराव कोथिंबिरे (सत्यशोधक विधी) – ९४२१६९०८००
वामनराव गार्डे – ९६६४२८७५४३

📞 शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
मो. ७३८७३७७८०१

👉 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा क्रमांक जोडा.
👍 बातमी लाईक करा
↗️ शेअर करा
📲 फॉरवर्ड करा
💬 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका.हॅशटॅग

#महात्माफुले२००वेजयंतीगौरववर्ष
#सत्यशोधकसमाज
#सत्यशोधकदशक्रिया
#राजापूर
#खटाव
#सातारा
#महात्माफुले
#सावित्रीबाईफुले
#सार्वजनिकसत्यधर्म
#समतावादीविचार
#विवेकवाद
#मानवतावाद
#पर्यावरणसंवर्धन
#वृक्षारोपण
#फुलेशाहूआंबेडकर
#सामाजिकपरिवर्तन
#वैज्ञानिकदृष्टिकोन
#शिवक्रांतीटीव्ही
#सत्यशोधकशंकरावलिंगे
#जयज्योतीरावफुले
#बहुजनचळवळ
#महाराष्ट्रNews
#SocialReform
#TreePlantation
#EqualityAndJustice

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button