अभिनंदन! अभिनंदन!! माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे येवला लासलगाव मतदार संघातील मतदार बंधू-भगिनीचे हार्दिक अभिनंदन!

महाराष्ट्रातील सर्व ओबीसी विजयी उमेदवारांनी कडवी झुंज देऊन हरले असले तरी सुद्धा जरांगे फॅक्टर मोडीत काढला. त्या सर्व उमेदवारांचे कार्यकर्त्यांचे मतदारांचे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे, नवनाथ आबा वाघमारे यांचे, एडवोकेट मंगेश ससाणे, सपना माळी शिवणकर यांनी गेल्या दीड वर्षांमध्ये अतोनात अपमान सहन करून, परिश्रम घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन धन्यवाद!…
जरांगे पाटील यांनी फक्त छगन भुजबळ साहेब यांना टार्गेट करत येवला मतदारसंघात रॅली काढून सभा घेतल्या. त्यामुळे ओबीसी मध्ये संतापाची लाट पसरली आणि त्यांनी महायुतीलाच मतदान केले.
जरांगे पाटील यांचा बोलवीता धनी ना. शरद पवार आहेत. ही बाब अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील बोलू लागला होता. या अगोदर शरद पवार साहेबांनी अनेक घर फोडलेले आहेत. हिरे, राजे भोसले, मोहिते पाटील, मुंडे, क्षीरसागर, गावित, वसंत दादा पाटील, घाडगे पाटील, शेंडगे इत्यादी घराणे. अनेक पक्ष फोडणे, रिपब्लिकन पार्टी, काँग्रेस पार्टी, शिवसेना अनेक छोटे-मोठे पक्ष फोडले होते. या वेळेला त्यांनी संत महात्मेही फोडायला सुरुवात केली. संत शिरोमणी सावता महाराज यांचे वसेकर घराणेही त्यांनी फोडले. आता त्यामुळे पवार साहेब घराण्यावर हे सर्व मतदार नाराज होते. “जैसी करनी वैसी भरणी” पवार साहेबांचा आयुष्य फोडाफोडीतच गेले. त्यामुळे त्यांचे घरी आज फुटलं. शेवटी आज मतदार ही फुटले. पवार साहेबांना मानणारा ओबीसी समाज पवार साहेबांच्या विरोधात गेला. या गोष्टीचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला.
जरांगे पाटील उघड उघड व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ओबीसी नेत्यांचा सुपडा साफ करण्याची भाषा बोलत होता. बीजेपीच्या उमेदवारांना पाडण्याची भाषा बोलत होता. महाविकास आघाडी मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवारांना पाडण्याची भाषा बोलत होता. परंतु तो जातीवादी असल्यामुळे जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार पाडण्याची भाषा बोलत नव्हता. याचा परीणाम ओबीसींना वाटणारी असुरक्षितता व त्याचे पर्यवसन महायुतीची “ओबीसी वोटबॅंक” मजबूत करण्यात वा वाढण्यात झाले.
यासोबतच महायुतीने लाडली बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी, सबसिडी, इ. विकास कामे हाती घेतली.
महायुतीने मराठा विरुद्ध ओबीसी असे जातीवर आधारित राजकारण न करता विकास कामांचे राजकारण केले म्हणून त्यांना घवघवीत यश आले.
येवला मतदारसंघात ना. छगन भुजबळ साहेबांचा विजय म्हणजे साहेबांनी केलेल्या विकास कामांना दिलेला कौल होय. त्याने कोणावरही टीका केली नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा ओबीसी वादावर भाषण केले नाही.मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला. फक्त
स्वतंत्र व जास्त आरक्षण घ्यावे इतकेच म्हणणे होते. अतिशय संयम पळून अनेक वेळा अपमान सहन करून मतदार संघामध्ये जोमाने काम केली. मराठ्यांनी अनेक ठिकाणी मतदारसंघात त्यांना गावबंदी केली. मतदान केंद्रावर येण्याची बंदी केली. तरीसुद्धा ओबीसीची सुप्त लाट आल्यामुळे भुजबळ साहेब अतिशय चांगल्या प्रकारे विजयी झाले. जरांगे आणि त्याचे कार्यकर्ते, मराठा नेते पवार साहेब भुजबळांना आपटून राहिले होते, तरीसुद्धा भुजबळ साहेबांना ते रोखू शकले नाहीत. पवार साहेबांच्या शेवटच्या अंकामध्ये लोकसभेमध्ये जातीवादी जरांगे फॅक्टर मुळे क्षणिक विजय झाला. महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात ओबीसी जागृत झाला एन केन प्रकारे ओबीसी ने पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला तुतारीला मतदान केले नाही. त्याचबरोबर काँग्रेस आणि उभाटाला सुद्धा त्याचा फटका बसला. राजकारण हे राजकारण असतं. जातीवर चालत नसतं, जातीवर चालत असतं तर अल्पसंख्यांक मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकर रावजी नाईक, अब्दुल रहमान अंतुले, मनोहर जोशी देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नसते हे जाणता राजा शरद पवार सारख्या मुरब्बी नेत्याला वेळीच कळायला पाहिजे होतं. सत्यशोधक फुले शाहू आंबेडकर नावाचा बुर्खा घेऊन पवार साहेबांनी आजपर्यंत ओबीसी अल्पसंख्यांक यांना फसवल्याचे भावना सर्व मतदारांमध्ये घर करून राहिली. त्यामुळेच ही निवडणूक महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली. जातीवादी जरांगेचा बुर्खा ओबीसी ने आज टराटरा फाडलेला आहे. भविष्यात असले धाडस कोणत्याही समाजाने करू नये, हीच निर्मिकास प्रार्थना.
तसेच जर महायुतीने. . ..
मुंबई या आर्थिक राजधानी वर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धनदांडग्यांच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला किंवा
विकासाचा मुद्दा सोडून जात – धर्माचा मुद्दा घेतला किंवा
भारतात जातिनिहाय जनगणना केली नाही किंवा
महिला आरक्षणात ओबीसी एससी एसटी एनटी या प्रवर्गाच्या महीलांना आरक्षण दिले नाही….तर तर महायुतीला निवडून देऊन डोक्यावर घेणारी हीच जनता महायुतीच्या या महासत्तेला सुरूंग लावून ती उलथवून लावल्या शिवाय राहणार नाही, व हा जगातील नैसर्गिक, सुर्यप्रकाश सारखा लख्ख परंतु सत्य असा इतिहास आहे हे देखील ध्यानात घ्यावे.!!!!!
जय ओबीसी जय संविधान जय जय विश्वनाथ प्रताप सिंग मंडल जय भीम जय भारत जय ओबीसी जय एससी एसटी अल्पसंख्याक आरक्षण धारक
सत्यमेव जयते !!!
सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!!!!
शिवक्रांती टीवी व
दीनबंधू न्यूज चॅनेल
संपादक :-
सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
हा नंबर आपला व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा
HTML img Tag
HTML img Tag
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम
Back to top button
×
No WhatsApp Number Found!