सोलापूर

बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाचा झंझावात! एका दिवसात दोन ग्राम शाखाध्यक्षांची निवड; जातनिहाय जनगणना, ओबीसी हक्क आणि फुले विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धार!

बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाचा झंझावात! एका दिवसात दोन ग्राम शाखाध्यक्षांची निवड; जातनिहाय जनगणना, ओबीसी हक्क आणि फुले विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धार!

बुलढाणा जिल्ह्यात अखिल भारतीय माळी महासंघाने संघटन विस्ताराला मोठी गती दिली असून एका दिवसात सागवन ग्राम शाखेच्या अध्यक्षपदी मा. सुभाष सखाराम गोरे आणि नांद्राकोळी ग्राम शाखेच्या अध्यक्षपदी मा. अशोक श्रीराम हुडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडी मा. विजय राजाभाऊ खरात (जिल्हाध्यक्ष) आणि मा. राजेंद्र पवार (तालुकाध्यक्ष) यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या.

या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्यात महासंघ तळागाळात वेगाने पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती गौरव वर्षानिमित्त तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाच्या विचारांचा प्रचार आता वाडी-वस्ती, तांडे आणि प्रत्येक घरापर्यंत केला जाणार आहे, असा निर्धार नव्या शाखाध्यक्षांनी व्यक्त केला.

याशिवाय जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, हा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम, पत्रक वाटप, नागरिकांशी संवाद तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत जातनिहाय जनगणनेच्या समर्थनाचा ठराव मंजूर करून तो केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.

या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. अभय तायडे, प्रदेश संघटक डॉ. गजाननजी अजगर, अमरावती विभागाध्यक्ष मा. शरदजी बनकर, किसान आघाडी तालुकाध्यक्ष मा. रामभाऊ अवचार, तालुका उपाध्यक्ष मा. रमेश माधवराव उबाळे आणि तालुका सचिव मा. उद्धव जयराम पवार यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

✍️ संपादकीय संदेश

अखिल भारतीय माळी महासंघाची ही वाटचाल केवळ पदनियुक्तीची नाही, तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. संघटना जितकी गावागावात पोहोचेल तितक्या ताकदीने समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचा आवाज बुलंद होईल. जातनिहाय जनगणना हा सामाजिक न्यायाचा पाया आहे. आता प्रत्येक गाव जागे होण्याची वेळ आली आहे.

– दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📲 आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 7387377801 हा नंबर जोडा.
👍 बातमी लाईक करा • 🔁 शेअर करा • ▶️ सबस्क्राईब करा • 📤 फॉरवर्ड करा • 💬 कमेंट करा.
दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल आणि ग्रुपला फॉलो करायला विसरू नका

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button