🎤 शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश! रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे १४ जुलै रोजी ‘पीडीजी के. भोगिशयन स्मृती व्याख्यान’; प्रा. डॉ. सुहास पेडणेकर करणार मार्गदर्शन

🎤 शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश! रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे १४ जुलै रोजी ‘पीडीजी के. भोगिशयन स्मृती व्याख्यान’; प्रा. डॉ. सुहास पेडणेकर करणार मार्गदर्शन
📰 दीनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
सोलापूर : शिक्षण क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्व आणि रोटरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. पीडीजी के. भोगिशयन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता निर्मलकुमार फडकुळे सभागृह, सोलापूर येथे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते “Educators as Nation Builders (राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांची भूमिका)” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
प्रा. डॉ. पेडणेकर हे डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू राहिले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (BATU) तसेच एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शिक्षक, संशोधक आणि प्रशासक म्हणून त्यांना चार दशकांहून अधिक अनुभव असून अमेरिकेतील Stevens Institute of Technology येथे पोस्ट-डॉक्टोरल फेलोशिप, १५२ संशोधन निबंध, २४ पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ यांसह अनेक राष्ट्रीय सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.
स्व. पीडीजी के. भोगिशयन हे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, आदर्श शिक्षक, प्रभावी वक्ते आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अभिमानास्पद सदस्य होते. त्यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि रोटरी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या स्मरणार्थ हे व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे.
या व्याख्यानमालेत यापूर्वी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, भारताचे माजी सरन्यायाधीश अॅड. उदय लळित, ह.भ.प. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज तसेच संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड यांसारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि सोलापूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष रोटे. मितेश पंचमिया व सचिव रोटे. कॅप्टन पार्थ दावडा यांनी केले आहे.
✍️ संपादकीय संदेश
शिक्षण हीच राष्ट्राच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारी आणि भावी पिढीला प्रेरणा देणारी अशी व्याख्यानमाला समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. अशा ज्ञानपर उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देणे ही काळाची गरज आहे.
📱 सोशल मीडिया संदेश
दीनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
✅ बातमी लाईक करा
✅ शेअर करा
✅ सबस्क्राईब करा
✅ फॉरवर्ड करा
✅ कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📢 दीनबंधू न्यूज WhatsApp चॅनल आणि ग्रुप फॉलो करायला विसरू नका.
#दीनबंधू_न्यूज #ShivkrantiTV #RotaryClubSolapur #Education #NationBuilders #DrSuhasPednekar #Solapur #MotivationalLecture




