
*ओबीसी उमेदवार श्री दिलिप खेडकर यांना विक्रमी मताधिक्य देऊ* – सुपा येथिल प्रचार बैठकीत ओबीसी नेत्यांची ग्वाही शनिवार दि २७ एप्रिल :- वंचित बहुजन आघाडीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जेष्ट ओबीसी नेते श्री दिलीप खेडकर यानी सुपा येथे तालुक्यातील प्रमुख ओबीसी , दलित ,बहुजन पदाधिकारी यांची भेट घेत. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघमधिल राजकिय, सामाजिक परिस्थीतीच्या बाबतीत चर्चा केली.
आणि लोकसभेच्या माध्यमातुन ओबीसी , बहुजन, वंचित ,उपेक्षित प्रश्न सोडवन्यात येइल आशी ग्वाही दिली. यावेळी पारनेर तालुक्यातील ओबीसी बहुजन प्रतिनिधी यानी श्री दिलीप खेडकर यांचा स्वागत केले. दिलिप खेडकर हे ओबीसी असल्याने त्याना पारनेर मधुन विक्रमी मताधिक्य देऊ
आशी ग्वाही सुपा येथिल प्रचार बैठकीत पारनेर नगर मतदारसंघाचे ओबीसी नेते प्रसाद खामकर यांनी सुपा येथिल प्रचार बैठकीत दिली. यावेळी पारनेर तालुका खादीग्राम उद्योगचे चेअरमन जेष्ट दलित नेते श्री राजेंद्र करंदीकर , समता परिषद नगर जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष लोंढे , धनगर समाजाचे युवा नेते गजानन कुलाळ , वाघुंडे गावचे माजी सरपंच संजय रासकर ,
ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल गाडीलकर , रायतळे गावचे माजी सरपंच श्री बापू साबळे , सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष रोहित मेमाणे कुंभार महासंघाचे श्री अनंत श्रीमंदीलकर , गोपाळ समाजाचे प्रतिनिधी श्री रमेश गव्हाणे , रुई छत्रपती गावचे ओबीसी प्रतिनिधी दत्तात्रय भुजबळ ,श्री शरद वाघमोडे, महेश शिंदे , श्री किरण नगरे , श्री नगरे तात्या . आदि ओबीसी बहुजन नेते उपस्थीत होते.
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
NEWS
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१


