लोकशाहीत मतदान वाया जात नसते …भाऊ

राजकीयार्थ ….( भाग १५ )
लोकशाहीत मतदान वाया जात नसते …भाऊ
भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच निवडणूक मध्ये सर्व भारतीयाना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला .कुणी गरीब असो वा श्रीमंत , शेतकरी असो वा उद्योजक , स्त्री असो वा पुरुष ,महाराष्ट्रीयन असो अथवा बिहारी…प्रत्येक भारतीय माणसाला निवडणूक मतदानाचा अधिकार मिळाला.अगदी चांगल्या पध्दतीने भारतीय व्यक्ती हा अधिकार वापरत आली आहे .भल्याभल्यांना योग्य वेळी योग्य समज देण्यासाठी आणि कमकुवत पण प्रामाणिक उमेदवाराला बळ देण्यासाठी आपला मतदानाचा हक्क भारतीय जनता वापरत आल्याची खूप चांगली उदाहरणे आहेत .मतदान करणे हे पवित्र कर्तव्य समजणारी बहुतांशी लोक आहेत हे देखील चांगले लक्षण आहे .लोकशाही टिकावी असे बहुतांशी लोकांना मनापासून वाटते ही गोष्ट असामान्य आहे . तरीही एक कुविचार प्रत्येक निवडणूक काळात सुप्तावस्थेत काम करतो आणि प्रभावीपणे काम करतो.याचकारणे त्या कुविचाराला वेळीच रोखणे हे भारतीय नागरिक म्हणून पहिले कर्तव्य ठरते.
निवडणूक ..अनेक पातळीवर खेळली जाते.यामध्ये विजेत्याला मतदान करा असा सुप्त प्रचार जोरात असतो.याचा अर्थ अमुक एक उमेदवार निवडून येणारच आहे असे ठाम गृहीतक काम करत असते.अशावेळी त्यालाच मतदान करून आपले मत विजयी पारड्यात टाका असा तो सूर असतो.अशावेळी काही लोक या प्रचाराला बळी पडतात आणि बाहूबली उमेदवाराला आपले आमुल्य देऊन स्वतःला मनाचे समाधान करतात.तो उमेदवार त्यांच्या मनात नसतो , उलट त्याच्या विषयी मनात थोडी कटूताच असते,तरीही त्याचे निवडणूक मधील पारडे जड वाटले की कशाला विरोधात जायचे असा तर्क करून लोक त्याच्या मतात वाढ करतात.याउलट एखादा चांगला उमेदवार आहे .पण त्याच्या विजयाची खात्री नाही .अशावेळी त्याला मतदान करून कशाला मत कुजवायचे असा व्यावहारिक विचार लोक करतात आणि इथेच एक वाईट गोष्ट घडते. लोकशाही व्यवस्थेत जितके महत्त्व सत्ताधारी वर्गाला असते जवळपास तेवढेच संविधानिक महत्त्व विरोधी पक्षाला असतेच.विरोधी पक्षनेता हा प्रधानमंत्र्याच्या तोडीचा समजला जावा अशी आपली पध्दती आहे .याचा अर्थ असा की , विरोधी मताना योग्य सन्मान असतो.लोकशाही टिकण्यासाठी अत्यंत लाभदायक अशी ही रचना आहे .जरी आपण मतदान केलेला उमेदवार हरला तरी तुमचे मत वाया जात नाही तर निवडून आलेल्या उमेदवाराला पहिली जाणीव करून देते की तुझा विजय अंतिम नाही ,तुझ्या विरोधात आमुक अमुक एवढी मते असून त्यांचा सन्मान केला पाहिजे .याचा अर्थ असा की , तुमचे मतदान हे नक्कीच सर्वार्थाने दखलपात्र असते. ते अजिबात कुजत नाही .
कुणाही व्यक्तीला विजय हवासाच वाटतो.मात्र तो विजय म्हणजे केवळ पाच वर्षाची संधी असते. कायमचा विजय नसतोच. आज आपण मतदान केलेली व्यक्ती भले निवडून आली नसेल पण ती चौकस असेल तर मतदारसंघ मधील प्रत्येक कामावर घारीसारखी नजर लावेल. याचा फायदा असा की , सत्ताधारी वर्गावर नियंत्रण राहील.ही देखील मोठी सेवा आहे लौकशाहीची.विजयी मतात आपले मतदान असेल तर जेवढा आनंद असतो तसाच आनंद विरोधी मतदान करूनही मिळवता येतोच. फक्त आपला आपल्या लोकशाही मुल्यांवर अतुट विश्वास हवा , योग्य समज हवी , नेमकी दृष्टी हवी.आपण करत असलेले प्रत्येक मतदान हे लोकशाही बळकटच करत असते हे ध्यानात घ्यायला हवे.
उमेशसूर्यवंशी
9922784065*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न् दीनबंधू न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१💐💐💐💐💐💐💐💐🔴🔴🙏


