सोशल

महाराष्ट्रातील तमाम सेवाकरी समाजातील ओबीसी माता, भगिनी, बंधूंनो….!

🌹🙏🏻🌹जय ओबीसी.. !
*महाराष्ट्रातील तमाम सेवाकरी समाजातील ओबीसी माता, भगिनी, बंधूंनो….!*
आपल्या *भारत देशाला खऱ्या अर्थाने आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, व बौद्धिक श्रमाने* घडविणाऱ्या व हजारो जाती उपजाती मध्ये विभागलेल्या आणि या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५२℅ एवढ्या मोठ्या व त्यातही बहुसंख्य भूमीहीन असलेल्या लोकसंख्येला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रतिनिधित्व म्हणून भारतीय राज्यघटनेने फक्त २७℅एवढे तुटपुंजे आरक्षण दिले.
त्या घटनात्मक अधिकारांमध्ये बेकायदेशीररित्या *सधन, सवर्ण तसेच सर्वच क्षेत्रात प्रबळ व बलाढ्य असलेल्या समाजाचा समावेश* केला आहे. *५६ लाख कुणबी नोंदी कायम करण्यात आल्या यामुळे सुमारे अडीच कोटी प्रबळ समाजातील लोकांची घुसखोरी* ओबीसीत झाली आहे.

सध्याचे सरकार या प्रबळ समाजाच्या दबावाखाली *सगे सोयरे, गणगोत,रक्त संबंध* आदींचा शासन निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावरच घेऊन आपणास *ओबीसींना देशोधडीला लावणार आहे.*
*ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय न्याय हक्कासाठी इथून पुढच्या सर्व निवडणुकीत आरक्षणवाद्यांचे मतदान आरक्षणवादी उमेदवाराला हाच नारा* घेऊन आपल्या पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास ३० ते ४० वर्षांचा अनुभव असलेले, ओबीसींचे विश्वासार्ह,शांत, संयमी, कृतिशील, खंबीर, विचारी आणि कणखर नेतृत्व माजी आमदार आदरणीय *प्रकाश आण्णा शेंडगे, प्रा. टी. पी. मुंडे, चंद्रकांत बावकर* आदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम ओबीसींचा राजकीय पर्याय म्हणून *ओबीसी बहूजन पार्टी* ची स्थापना झाली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित सर्वच राजकीय सत्ताधारी व विरोधी पक्षातील दलाल ओबीसी उमेदवारांना ओबीसींनी मतदान करायचे नाही. आपल्या पुढच्या पिढ्यांना भारतीय राज्यघटनेचे संरक्षण टिकवून ठेवण्यासाठी आता फक्त *ओबीसी बहूजन पार्टी* चाच उमेदवार आपला खासदार व आमदार असेल. तरच पुढच्या पिढीला आपण तोंड दाखवू शकणार आहोत.
तर मग आपल ठरलं *आरक्षणवाद्यांचे मत आरक्षणवादी उमेदवारासच*
दिगंबर बं. लोहार,
राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य,
*ओबीसी बहूजन पार्टी*

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button