सोलापुरात ३१ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान शिवमहापुराण कथा, भव्य ग्रंथ दिंडी, आरोग्य शिबिर व विविध धार्मिक कार्यक्रम; पत्रकार परिषदेत माहिती

दिन बंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
सोलापुरात ३१ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान शिवमहापुराण कथा, भव्य ग्रंथ दिंडी, आरोग्य शिबिर व विविध धार्मिक कार्यक्रम; पत्रकार परिषदेत माहिती
सोलापूर | प्रतिनिधी
श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, सोलापूर व एस. एस. सावळे वीरशैव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढमासानिमित्त शिवमहापुराण कथा, भव्य ग्रंथ दिंडी, विविध धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर तसेच ग्रंथ प्रकाशन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की ३१ जुलै ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत श्री श्री श्री १००८ जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून शिवमहापुराण कथेला प्रारंभ होणार आहे.
३१ जुलै रोजी सकाळी कामेश्वर व गणेश रथस्वामिभिषेक, ध्वजारोहण, कंसुमसे सुहासिनींच्या हस्ते भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी उद्घाटन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
१ ऑगस्ट रोजी खासदार अजित गोपछडे, आमदार बसवराज पाटील, उद्योगपती गोविंदराव मानकोणे यांच्या हस्ते ‘वीरशैवागम वेदोक्त शिवपूजा विधी’ या ग्रंथाचे प्रकाशन व सत्कार सोहळा होणार आहे.
२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून ७ ऑगस्ट रोजी शिवमहापुराण कथा सांगता, महाप्रसाद व समारोप सोहळा होणार आहे.
पत्रकार परिषदेत विविध मठांचे पूज्य स्वामी, धार्मिक पदाधिकारी व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर :
सुमित स्वामी
संतोष स्वामी
विद्यानंद स्वामी
लिंगराज स्वामी (खंडाळ)
कल्लय्या गणेचारी
ओंकार स्वामी
तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
✍️ संपादकीय संदेश
धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक परंपरा जपणारे कार्यक्रम समाजात ऐक्य, अध्यात्म आणि सेवाभाव वाढविण्यास मदत करतात. अशा विधायक उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजहिताच्या कार्याला बळ द्यावे, हीच अपेक्षा.
— सत्यशोधक शंकरराव लिंगे
संपादक, दिन बंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ह
📲 आपला WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा : 7387377801
👍 बातमी लाईक करा
🔁 शेअर करा
📤 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
▶️ सबस्क्राईब करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📢 दिन बंधू न्यूज WhatsApp चॅनल व ग्रुप फॉलो करायला विसरू नका.
#दिनबंधून्यूज #ShivkrantiTV #सोलापूर #शिवमहापुराण #वीरशैव #धार्मिककार्यक्रम #पत्रकारपरिषद #शिवभक्त #महाराष्ट्र #सत्यशोधकशंकररावलिंगे




