🌼 “महात्मा फुले २०० वा जयंती महोत्सव — सामाजिक न्यायासाठी शासकीय समितीच्या ठोस मागण्यांचा !” 🌼

🌼 “महात्मा फुले २०० वा जयंती महोत्सव — सामाजिक न्यायासाठी शासकीय समितीच्या ठोस मागण्यांचा !” 🌼
आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आणि थोर समाजसुधारक यांच्या २०० व्या जयंती महोत्सवानिमित्त ‘महात्मा फुले कार्य गौरव वर्ष’ साजरे करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने गठित केलेल्या समितीची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत समितीचे सदस्य व मंत्री यांनी विविध महत्त्वपूर्ण मागण्या शासनासमोर मांडल्या. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत , यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुणे येथील आणि यांचे विस्तारीकरण करण्यासाठी रेंगाळलेले भूसंपादनाचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच येथे राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्ण करून ते राष्ट्राला अर्पण करावे, अशी मागणी करण्यात आली. नायगाव, कटगुण खानवडी यांसह सत्यशोधक समाजाशी संबंधित स्थळांचा ऐतिहासिक विकास करावा, अशीही मागणी करण्यात आली.
सामाजिक न्याय, शिक्षण, स्त्री सबलीकरण, शेती व संविधानिक मूल्यांवर आधारित राज्यस्तरीय ‘महात्मा फुले विचार संमेलन’ व परिसंवादांचे आयोजन करावे, तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष उपक्रम राबवावेत आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्यानमाला, निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात, अशी मागणी समितीने केली. महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, फेलोशिप आणि विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
‘महात्मा फुले विचार रथ’, लोककला, पथनाट्य आणि डिजिटल माध्यमांतून राज्यभर सामाजिक प्रबोधन करावे, तसेच महात्मा फुले यांच्या साहित्याचे पुनर्प्रकाशन, अनुवाद, डिजिटल संग्रहालय निर्मिती करून त्यांच्या वाङ्मयाचा व्यापक प्रसार करावा, अशी मागणी करण्यात आली. यांच्या विचारांवर आधारित स्त्री शिक्षण, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासासाठी विशेष योजना राबवाव्यात, असेही समितीने नमूद केले.
कलिना येथील ‘फुले-शाहू-आंबेडकर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय’ इमारतीचे लोकार्पण करावे आणि नायगावचे ‘क्रांतीज्योती सावित्रीनगर’ असे नामकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. “महात्मा फुले २००” हे विशेष बोधचिन्ह मंजूर करून ते शासकीय पत्रव्यवहारात वापरावे, तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कार द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
सर्व विद्यापीठे तसेच शालेय अभ्यासक्रमात महात्मा फुले यांच्या साहित्याचा समावेश करावा, महात्मा फुले जयंतीदिनी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत अभिवादन व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करावेत, तसेच राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय महात्मा फुले सामाजिक संशोधन केंद्र व सावित्रीबाई फुले महिला संशोधन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रांचे मुद्रण करावे, चित्ररूप चरित्र प्रकाशित करावे, तसेच ११ एप्रिल रोजी प्रत्येक शाळेत प्रभात फेरी, अभिवादन आणि विशेष व्याख्यानांचे आयोजन करावे, अशी मागणी समितीने केली. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करावा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी विदेशातील विद्यापीठांमध्ये कार्यक्रम आयोजित करावेत, अशीही मागणी करण्यात आली.
महात्मा फुले यांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे असून ते संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ‘महात्मा फुले कार्य गौरव वर्ष’ व्यापक स्वरूपात साजरे करण्यासाठी शासनाने वरील सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
📺 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही ✍️ संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे 📞 73 87 37 78 01
#MahatmaPhule200 #महात्माफुले #JyotibaPhule #SocialJustice #PhuleJayanti #Maharashtra #Equality #EducationForAll #ShivkrantiTV #DeenbandhuNews






