सोलापूर

मुंबईत समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सभा उत्साहात संपन्न — सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

मुंबईत समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सभा उत्साहात संपन्न — सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

मुंबई येथील एम.ए.टी. कॉलेज, बांद्रा येथे च्या तालुका व जिल्हा

‘♥

पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी भव्य सभा पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान ओबीसी नेते व संस्थापक अध्यक्ष यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

 

r 1

सभेत प्रदेश उपाध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, ज्येष्ठ नेते सौदागर क्षीरसागर गुरुजी (ओझेवाडी), सुभाष दाजी ननवरे, कुंदन भैया पाटकुल, अमित नरोटे (उपसरपंच कंदलगाव) तसेच महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो समता सैनिकांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून बापूसाहेब भंडारे यांची घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्ष म्हणून दक्षिण सोलापूर – संजय केराप्पा होनमाने, मोहोळ – शंकर भोजन जाधव, उत्तर सोलापूर – सावता केशव डोके, मंगळवेढा – संतोष शिवाजी गोडसे, पंढरपूर – लक्ष्मण शिंदे यांना निवडपत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या सभेला विधान परिषद आमदार , माजी खासदार , बापूसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष रवी भाऊ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच महापुरुषांना पुष्पांजली वाहण्यात आली.

सभेत बोलताना यांनी सांगितले की, यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल 2026 पासून राज्यभर 220 वे जयंती वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील सुमारे 400 तालुक्यांमध्ये गावोगावी सभा, मेळावे, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिला मेळावे, प्रबोधन कार्यक्रम आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

सभेत दोन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. पहिला ठराव म्हणजे ओबीसी कॉलमसह जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, तर दुसरा ठराव म्हणजे महात्मा फुले जयंती वर्षानिमित्त राज्यभर व्यापक सामाजिक जनजागृती कार्यक्रम राबविणे.

अध्यक्षीय भाषणात यांनी गेल्या 35 वर्षांत देशभर राबवलेल्या सामाजिक चळवळींचा आढावा घेतला आणि त्यातून मिळालेल्या यशस्वी परिणामांची सविस्तर माहिती दिली. तसेच ओबीसी समाजावर होणारा अन्याय, दुष्काळी परिस्थिती आणि विविध प्रश्नांवर येत्या काळात रस्त्यावर, न्यायालयात आणि सभागृहात आवाज उठविणार असल्याचा ठाम इशाराही त्यांनी दिला.

सोशल मीडिया संदेश:
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही — संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 संपर्क: 7387377801 (हा नंबर आपल्या व्हॉट्सॲपमध्ये सेव्ह करा)
👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा | 📤 फॉरवर्ड करा | 💬 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

#समता_परिषद #छगनभुजबळ #OBC #महात्मा_फुले #समता_सैनिक #महाराष्ट्र

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button