कायद्याने ओपन जागेवर कोणताही अध्यक्ष होऊ शकतो; तरीही मराठा समाजाने मुंडन करून स्वतःचे तोंड काळे केले

कायद्याने ओपन जागेवर कोणताही अध्यक्ष होऊ शकतो; तरीही मराठा समाजाने मुंडन करून स्वतःचे तोंड काळे केले
सोलापूर शहरात महापौर पदावर ओबीसी समाजातील उमेदवार निवडून आल्यानंतर मराठा समाजातील काही घटकांनी रंगपंचमीच्या दिवशी मुंडन करून व काळा रंग लावून निषेध नोंदवला. मात्र कायद्याने ओपन जागेवर कोणत्याही समाजातील व्यक्तीला अध्यक्ष किंवा महापौर होता येते, हे स्पष्ट असताना असा निषेध करण्यात आल्यामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओपन जागा ही सर्व समाजांसाठी खुली असते. त्या जागेवर कोणत्याही जातीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. तरीही सोलापूरमध्ये ओबीसी महापौर झाल्यामुळे काही मराठा संघटनांनी काळी रंगपंचमी साजरी करून डोक्याचे केस कापून मुंडन केले व अंगावर काळा रंग लावून आंदोलन केले. या घटनेवरून ओबीसी समाजात प्रश्न उपस्थित केला जात आहे की, कायद्याने वैध असलेल्या निवडीचा निषेध का केला जात आहे?
सोलापूर शहरात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नगरसेवकांमध्येही ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मोठे असल्यामुळे महापौर पदावर ओबीसी उमेदवार निवडला जाणे ही लोकशाही प्रक्रियेची नैसर्गिक परिणती असल्याचे मत ओबीसी समाजातून व्यक्त होत आहे. त्यामुळे ही निवड पूर्णपणे कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने झालेली असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, ओबीसी संघटनांचा आरोप आहे की, राज्यातील अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या जागांवर मराठा किंवा कुणबी-मराठा म्हणून ओळख असलेल्या उमेदवारांना बसवण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत 2002 साली ओबीसी आरक्षणाच्या जागेवर कुणबी-मराठा म्हणून ओळख असलेल्या उमेदवाराला अध्यक्षपद देण्यात आल्याचा आरोपही करण्यात येतो. त्याचप्रमाणे इतर काही जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या घटनांमुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
यावर्षी 2025 मध्ये सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या सोडतीत पुन्हा ओबीसी आरक्षण निघाले आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा बोगस कुणबी-मराठा उमेदवार बसवण्याच्या हालचाली होत असल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे. जर असे प्रकार घडले तर सामाजिक संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू आहे.
मराठा-कुणबी समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रश्नावरून न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयात सुमारे 25 याचिका दाखल असून सर्वोच्च न्यायालयातही काही प्रकरणे सुरू आहेत. त्यामुळे या प्रश्नावर अंतिम निर्णय न्यायालयातूनच होणार असल्याचे सांगितले जात आहे.
ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा ओबीसी आरक्षणाच्या जागांवर इतर समाजातील उमेदवार बसवले जातात तेव्हा अनेकदा विरोध केला जात नाही; मात्र एखाद्या ठिकाणी ओपन जागेवर ओबीसी उमेदवार निवडून आला तर त्याचा निषेध केला जातो. त्यामुळे हा प्रश्न सामाजिक न्यायाचा असल्याची भूमिका काही संघटनांनी मांडली आहे.
यासंदर्भात माहिती देताना दिनबंधू न्यूज व शिवक्रांती टीव्हीचे संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सांगितले की, सोलापूर महानगरपालिकेतील महापौर निवड ही कायद्याच्या चौकटीत झालेली आहे. ओपन जागेवर कोणत्याही समाजातील व्यक्तीला निवडून येण्याचा अधिकार आहे आणि तो लोकशाहीचा मूलभूत भाग आहे.
📢 सोशल मीडिया संदेश :
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये 7387377801 हा नंबर जोडा.
बातमी लाईक करा – शेअर करा – सबस्क्राईब करा – फॉरवर्ड करा – कमेंट करा.
बेल आयकॉन दाबायला विसरू नका.




