नागरी विमान वाहतूक मंत्रालयात आज महाराष्ट्रातील सोलापूर येथील विमानतळासंदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

नागरी विमान वाहतूक मंत्रालयात आज महाराष्ट्रातील सोलापूर येथील विमानतळासंदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मा. श्री. राममोहन नायडूजी, मा.राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
यावेळी खालील प्रमुख मुद्याच्या बाबतीत चर्चा झाली व लवकरात लवकर सोलापूर येथील विमातळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
– केंद्र सरकारने उडान-आरसीएसच्या माध्यमातून सोलापूर विमानतळावर ५० कोटी रुपये खर्च करून विविध विकासकामे केली आहेत.
– विमानतळावर आवश्यक मनुष्यबळांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच हे दल सेवेत दाखल होणार आहे.
– डीजीसीए लायसन्सची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्रीमहोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सोलापूर-मुंबई,सोलापूर-तिरुपती, सोलापूर-दिल्ली, सोलापूर-हैदराबाद आदी विमानसेवा सुरू करण्याबाबत विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मा. श्री. राममोहन नायडू, मा.राज्यमंत्री श्री. मुरलीधर जी मोहोळ, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. एम सुरेश, नियोजन आणि संचालन मंडळाचे सदस्य डॉ. शरद कुमार तथा आकासा, इंडिगो आदी विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




