जागो ओबीसी जागो

जागो ओबीसी जागो
मा.ना.श्री.छगन भुजबळानी ओबीसिंवर होणारा अन्याय रोखण्यासाठी जीवाचे रान केले. मराठा समाज ओबीसीमध्ये घुसू पहात होता त्याला भुजबळांनी कडाडून विरोध केला. ह्यामुळे मराठा समाजाची ओबीसिंचे आरक्षण लाटण्याची मनीषा पार धुळीला मिळाली. ह्याचा बदला म्हणून आज मराठा समाज छगन भुजबळांना राजकारणातून उठविण्यासाठी सरसावला असल्याचे मराठ्यांच्या ह्या कृतिने दिसून येतेय.
ओबीसी बांधवानो! छगन भुजबळ आपली लढाई लढले आहेत. त्यांनी ओबीसीना एकतर्फी बळ दिले. आज मराठा समाज त्यांच्यावर संकट म्हणून उभा आहे. ह्यातून भुजबळांची आब राखणे प्रत्येक ओबीसी बांधवाचे कर्तव्य आहे. आज संपूर्ण देशात ओबीसीची संख्या जास्त आहे. सगळे ओबीसी एकवटले तर देशात फक्त ओबीसिंचीच सत्ता येऊ शकते. राज्यातही ह्यापेक्षा वेगळे चित्र नाही. म्हणून भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. जो पक्ष भुजबळांना उमेदवारी देणार नाही, त्या पक्षाना मते नाकारून बाद करा. ‘एक भुजबळ पाडाल तर आम्ही सगळे मराठे पाडू’ ही घोषणा सत्यात उतरवा. देशात ओबीसिंची सत्ता आणा.
ओबीसी समाजाच्या पक्षालाच झाडूनपुसून मते द्या.
बंधुनो!
आता नाही तर कधीच नाही.




