सोलापूर

😭 अकस्मात ब्रेन स्ट्रोकने अशोक बाबुराव शिंदे यांचे दुःखद निधन; शोकाकुल कुटुंबाला शंकरराव लिंगे यांची सांत्वन भेट

😭 अकस्मात ब्रेन स्ट्रोकने अशोक बाबुराव शिंदे यांचे दुःखद निधन; शोकाकुल कुटुंबाला शंकरराव लिंगे यांची सांत्वन भेट

अंथुर्णे (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील रहिवासी अशोक बाबुराव शिंदे (वय 63) यांचे अचानक ब्रेन स्ट्रोकमुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मित जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कै. अशोक बाबुराव शिंदे यांच्या पश्चात आई सैनाबाई शिंदे, पत्नी अनुसया शिंदे, मुलगे अतुल व पप्पू तसेच एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या साध्या, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात आपली वेगळी छाप सोडून गेले होते. त्यांच्या जाण्याने समाजातील एक सज्जन व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

या दुःखद प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिंदे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी भाऊ राजू व नाना शिंदे उपस्थित होते.

तसेच समता परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे, अखिल भारतीय माळी महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष अमर बोराटे आणि शंकरराव लिंगे (अण्णा) यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थितांनी कै. शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबाला धीर दिला.

ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण प्रार्थना. 🙏🕯️

📢 सोशल मीडिया सूचना — दिनबंधू न्यूज | सेवक क्रांती टीव्ही
👉 सत्यशोधक शंकरराव लिंगे: 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा | 📲 फॉरवर्ड करा | 💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा — अपडेट्स चुकवू नका!

#श्रद्धांजली #AshokShinde #CondolenceVisit #ShankarraoLinge #MaliMahasangh #Indapur #PuneDistrict #दिनबंधू_न्यूज #सेवक_क्रांती_टीव्ही

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button