🕯️ दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🕯️

🕯️ दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🕯️
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची सुकन्या, स्वर्गीय डॉ. सौ. जयश्री प्रशांत गवळी
(जन्म : २० जानेवारी १९८५ | स्मृतिदिन : ५ जुलै २०२४)
आज, ५ जुलै २०२६ रोजी स्वर्गीय डॉ. सौ. जयश्री प्रशांत गवळी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन.
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची सुकन्या म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबातील सामाजिक विचारांचा वारसा जपत वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीची मूल्ये जपली. अल्पायुष्यात त्यांनी आपल्या कार्यातून अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले.
त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजमनाला मोठा धक्का बसला. त्या आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचे प्रेम, त्यांची माणुसकी, सेवाभाव आणि प्रेरणादायी कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात कायम जिवंत राहतील.
स्वर्गीय डॉ. जयश्री प्रशांत गवळी यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन!
लिंगे परिवार
॥ सत्यमेव जयते शांती ॥ 🌹




