सोलापूर

🛑🔥 अक्कलकोटच्या राजकारणात मोठी हालचाल! छगन भुजबळ–सिद्धाराम म्हेत्रे भेटीने तालुक्याच्या विकासाला नवी दिशा; आगामी राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा! 🔥🛑

🛑🔥 अक्कलकोटच्या राजकारणात मोठी हालचाल! छगन भुजबळ–सिद्धाराम म्हेत्रे भेटीने तालुक्याच्या विकासाला नवी दिशा; आगामी राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा! 🔥🛑

✍️ दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

अक्कलकोट | प्रतिनिधी :
माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या ‘सातपुडा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अक्कलकोट तालुक्यातील विविध विकासकामे, जनहिताचे प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

सिद्धाराम म्हेत्रे यांच्या राजकीय प्रवासात छगन भुजबळ यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे राहिले आहे. आमदार होण्यापूर्वी म्हेत्रे यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती अशी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी टप्प्याटप्प्याने राजकीय वाटचाल केली.

सन १९९८ च्या पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात तसेच निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी छगन भुजबळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही भुजबळ यांनी विविध निवडणुकांमध्ये म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतल्याचे अनेक कार्यकर्ते सांगतात.

सध्या सिद्धाराम म्हेत्रे हे शिवसेनेच्या शिंदे गटात कार्यरत असून, महायुतीतील समन्वयामुळे त्यांच्या राजकीय प्रभावात वाढ झाल्याची चर्चा अक्कलकोट तालुक्यात सुरू आहे. स्थानिक विकास, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेले सशक्त नाते यामुळे त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या या सदिच्छा भेटीनंतर अक्कलकोटच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्याला मिळवून देण्यासाठी सिद्धाराम म्हेत्रे प्रभावी पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

✍️ संपादकीय संदेश :
राजकारणाचे अंतिम ध्येय हे जनतेचा विकास, लोकहिताची कामे आणि समाजाच्या सर्व घटकांचा विश्वास संपादन करणे हेच असते. लोकप्रतिनिधींनी पक्षीय भेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यांवर एकत्र येणे, संवाद वाढवणे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. अक्कलकोटच्या विकासासाठी प्रत्येक सकारात्मक प्रयत्नाचे स्वागत व्हावे, हीच अपेक्षा.

📲 आपला मोबाईल क्रमांक 7387377801 हा आपल्या सर्व सोशल मीडिया व व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा.

👍 बातमी लाईक करा
📤 शेअर करा
▶️ सबस्क्राईब करा
📨 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📢 दिनबंधू न्यूज व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करायला विसरू नका!

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधकशंकररावलिंगे #सिद्धारामम्हेत्रे #छगनभुजबळ #अक्कलकोट #विकास #महायुती #महाराष्ट्रराजकारण #जनहित #लोकविकास #BreakingNews #Solapurटीप: ll

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button