सोलापूर
महात्मा फुले यांचा पुतळा तोडण्याचा नीच कट – बहुजन समाजाचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न

- महात्मा फुले यांचा पुतळा तोडण्याचा नीच कट – बहुजन समाजाचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न!
- तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेलाराम गावात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करून तोडण्याचा घृणास्पद कट रचण्यात आला असून या समाजद्रोही कृत्यामुळे संपूर्ण देशातील फुलेप्रेमी संतप्त झाले आहेत.
महात्मा फुले हे सामाजिक न्यायाचे, समतेचे आणि बहुजनांच्या स्वाभिमानाचे तेजस्वी प्रतीक असून त्यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे एससी एसटी ओबीसी आणि सर्व बहुजन समाजावर थेट हल्ला आहे.
समाजकंटकांची ही विकृत मानसिकता बहुजन एकतेला आव्हान देणारी असून अशा प्रवृत्ती चिरडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संघटनांनी दिला आहे.
या अमानुष कृत्याचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ आणि सर्व बहुजन संघटनांकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
दोषींवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा बहुजन समाज रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन छेडेल असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी यांना बुधवार 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ठीक 1 वाजता निवेदन देण्यात येणार आहे.
त्यासाठी सर्व संघटना व फुलेप्रेमींनी दुपारी 12.30 वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी केले आहे.
फुलेविचारांवर होणारा कोणताही हल्ला बहुजन समाज सहन करणार नाही आणि अन्यायाविरुद्ध एकजुटीने संघर्ष केल्याशिवाय थांबणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे.
चलो सोलापूर!
चलो सोलापूर! ✊🔥




