🔥 सोलापूर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा झंझावाती प्रचार सपाटा — भाजपचाच विकासाचा एकमेव पर्याय! 🔥

🔥 सोलापूर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा झंझावाती प्रचार सपाटा — भाजपचाच विकासाचा एकमेव पर्याय! 🔥
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजल्यापासून बार्शी, नरखेड, उपळाई, बेंबळे, टेंभुर्णी, मोडनिंब आदी ठिकाणी सलग जाहीर सभा घेत जोरदार प्रचार केला. या सभांमधून बार्शी व माढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने आजपर्यंत केलेली विकासकामे आणि पुढील काळातील ठोस विकास आराखडा थेट जनतेसमोर मांडण्यात आला. पालकमंत्री म्हणून प्रत्येक काम पूर्ण करण्याची ठाम हमी त्यांनी दिली.
पुढे बोलताना जयकुमार गोरे साहेब म्हणाले की, देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना सोलापूर जिल्हाही भाजपच्या माध्यमातून सत्तेत गेला पाहिजे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. विरोधक कितीही टीका करोत, निधी हा सत्तेच्या माध्यमातूनच येतो आणि योग्य दिशा मिळाल्यावरच विकास होतो. त्यामुळे आपल्या भागातील सर्व उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचेच निवडून द्यावेत, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
या सभांना माजी समाज कल्याण सभापती शिवाजी राजे कांबळे, रणजीत बबनदादा शिंदे, सर्व भाजप उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता भाजपला मोठे यश मिळेल, असेच मत अनेकांनी व्यक्त केले. मात्र काही ठिकाणी ओबीसी जागांवर कुणबी मराठा उमेदवार उभे केल्यामुळे भाजपला फटका बसू शकतो, अशीही चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे काही ओबीसी नेते नाराज असल्याचे चित्र दिसून आले. तरीही एकंदर वातावरण भाजपच्या बाजूने असून काही मोजक्या ठिकाणीच अडचणी असल्याचे स्पष्ट झाले.
🟥 हा सोशल मीडिया संदेश आहे 🟥
📣 सोशल मीडिया सूचना :
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 ७३ ८७ ३७ ७८ ०१ — हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कॉमेंट करा
👉 बेल आयकॉन दाबा — विसरू नका!
#जयकुमारगोरे #BJPZindabad #SolapurZP #PanchayatSamitiElection #Barshi #Madha #विकासासाठीभाजप #ZPनिवडणूक #दिनबंधून्यूज #ShivkrantiTV






