📍 माऊली लॉन्स, येवला | शोकसभा व अस्थिकलश दर्शन

📍 माऊली लॉन्स, येवला | शोकसभा व अस्थिकलश दर्शन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे अस्थिकलश आज येवला येथे आणण्यात आले. माजी खासदार समीर भुजबळ आणि विधानपरिषद सदस्य आ. पंकज भुजबळ यांच्यासमवेत नाशिक येथून हे अस्थिकलश येवल्यात आणण्यात आले. हस्ती कलशाचे पूजन यावल्याचे आमदार अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी करून विनम्र अभिवादन केले
येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध पक्षांचे, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि येवला–लासलगाव मतदारसंघातील नागरिकांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली. अत्यंत भावपूर्ण वातावरणात सर्वांनी स्व. दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. पक्षाच्या पलीकडे जाऊन अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे, हे आज पुन्हा एकदा दिसून आले.
२ ऑक्टोबर २०२४ रोजी येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण स्व. अजितदादांच्या हस्ते झाले होते. तीच दादांची येवल्याला शेवटची भेट ठरेल आणि पुन्हा ते अस्थींच्या रूपानेच येथील जनतेसमोर येतील, असे कोणालाही वाटले नसेल. पण नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही…
यावेळी शोकपर मनोगतातून स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध पक्षांचे, संघटनांचे आजी–माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली… अजितदादा अमर रहें… 🙏
🟡 सोशल मीडिया सूचना (आवर्जून वाचा):
📲 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01 (हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा)
👍 बातमी LIKE करा
🔁 SHARE करा
📩 FORWARD करा
💬 COMMENT करा
🔔 SUBSCRIBE करून BELL ICON दाबा — विसरू नका!
🔖 हॅशटॅग:
#AjitDadaPawar
#अजितदादा_अमर_रहें
#Shraddhanjali
#Yeola
#NCP
#भावपूर्ण_श्रद्धांजली
#DinbandhuNews
#ShivkrantiTV
#SatyashodhakShankarraoLinge
#MaharashtraPolitics
#अस्थिकलश_दर्शन



