🔥 अखेर धनगर एसटी आरक्षण आंदोलनातून माघार!आझाद मैदानात ‘खेळ कुणाचा?’ — आंदोलन स्थगित, संशय अधिक गडद 🔥

🔥 अखेर धनगर एसटी आरक्षण आंदोलनातून माघार!आझाद मैदानात ‘खेळ कुणाचा?’ — आंदोलन स्थगित, संशय अधिक गडद 🔥
मुंबईतील आझाद मैदानातून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेले बेकायदेशीर व बिगरपरवानगी आंदोलन अखेर माघारी घेण्यात आल्याची घोषणा दीपक बोराडे यांनी केली. 17 जानेवारी रोजी जालन्यातून दीपक बोराडे यांना त्यांच्या घरातून पोलिसांनी जबरदस्तीने अटक केल्यानंतर आंदोलन चिघळले. मात्र काही वेपोलिसांनी सोडल्यानंतर गनिमी काव्याने. त्यानंतर बोरहाडे थेट मुंबईत दाखल झाले. “मला मुंबईत पोहोचवणारी गाडी मराठा समाजाची होती, मराठा समाजानेच मला वाचवले लपवले मराठ्यांनीच मला इथे आणले,” असे त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितले. या अगोदरही त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे कौतुक केले होते जरांगे पाटलापासून आपण काहीतरी शिकले पाहिजे असेही जाहीर केलं होतं
आंदोलन यशस्वी झाले असून, पुढील आंदोलन 28 जानेवारी रोजी न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर कायदेशीर व सनदशीर मार्गानेच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज आझाद मैदानात सुरू असलेले हे आंदोलन बेकायदेशीर असल्याने त्यातून माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, धनगर समाजातील काही लोकांनी “सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आहेत, अर्ज भरणे व प्रचार करणे महत्त्वाचे आहे, आंदोलन महिन्यानंतरही करता येईल,” अशा प्रतिक्रिया दिल्या. यावर दीपक बोराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांना “आपल्या अवकातीत राहा,” असा थेट इशारा दिला.
एकंदरीत हे आंदोलन धनगर समाजाचे कमी आणि जरांगे पाटील समर्थकांचे अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. जरांगे पाटलांनी या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला असून, आंदोलकांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश मराठा समाजाला दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या आंदोलनामागे नेमका ‘गोड बंगाल’ कोणाचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हे खरंच धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठीचे आंदोलन आहे की ओबीसीविरुद्ध सुरू असलेल्या मराठा संघर्षाचा भाग म्हणून ओबीसी समाजाला कमकुवत करण्याचा डाव आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.
धनगर समाजातील अनेक नेत्यांनीही याच धर्तीवर संशय व्यक्त करणारी वक्तव्ये केली आहेत. या संपूर्ण प्रकारावर धनगर समाजातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ओबीसी समाजालाही या आंदोलनामागील राजकीय गणित अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. पुन्हा एकदा सरकारकडून राजकीय खेळी सुरू असल्याचे चित्र दिसत असून, ओबीसीविरुद्ध मराठा संघर्षातून धनगर समाजाचा एक मोठा घटक वेगळा काढण्याचा प्रयत्न होत असल्याची तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे.
▶ आंदोलन स्थगितीचे परिणाम :
• धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न तात्पुरता बाजूला
• ओबीसी आरक्षणातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता
• मराठा–ओबीसी–धनगर या त्रिकोणात राजकीय अस्थिरता
• न्यायालयीन मार्गावर आंदोलन नेण्याचा निर्णय, पण विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
• निवडणूक काळात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता
📢 सोशल मीडिया संदेश :
धनगर एसटी आरक्षण आंदोलन अचानक माघारी! आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन थांबले, पण प्रश्न अधिक गंभीर झाले. हा लढा धनगर समाजाचा की ओबीसीविरुद्ध मराठा राजकारणाचा डाव? सत्य लवकरच समोर येईल.
👉 सोशल मीडिया सूचना :
ही बातमी लाईक करा 👍
शेअर करा 🔄
कमेंटमध्ये आपले मत मांडा ✍️
आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा 📲
अपडेटसाठी आमच्या ग्रुपमध्ये 7387737871 हा नंबर अॅड करा
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा 🔔
#हॅशटॅग :
#धनगरआरक्षण #STRreservation #आझादमैदान #दीपकबोराडे #जरांगेपाटील #OBCआरक्षण #मराठाओबीसीसंघर्ष #महाराष्ट्रराजकारण #आरक्षणराजकारण #दिनबंधून्यूज




