🔥 ओबीसीवर अन्याय करणाऱ्यांना आता उत्तर मिळणारच! सोलापुरात ओबीसी बहुजन पार्टीचा एल्गार – प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार 🔥

🔥 ओबीसीवर अन्याय करणाऱ्यांना आता उत्तर मिळणारच! सोलापुरात ओबीसी बहुजन पार्टीचा एल्गार – प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार 🔥
ओबीसी बहुजन पार्टीची पहिली ऐतिहासिक बैठक सोलापुरात पार पडली. माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद कार्यालयाजवळील समृद्धी हॉटेलमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे खजिनदार जे . डी . तांडेल, सचिव चंद्रकांत बावकर संघटक पांडुरंग मिरगळ, ओबीसी नेते, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, अर्जुन दादा सलगर, शेखर बंगाळे, सोनार समाज नेतेआपासाहेब होनमाने
टिपण्णा लोहासंदीप दहीगुडेकृष्णात वाघमोडे
महावीर बंडगरअक्षय येलगुंडे
निमेषा वाघमोडेअर्चना ताई बंडगर
अंबिका गुरवलांडगे ताईराजन दीक्षित, वाघमोडे वहिनी यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.पांडुरंग मिरगळ यांनी प्रस्थापित सत्तेला हादरवण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टी ताकदीने, कष्टाने आणि जिद्दीने काम करेल असा इशारा दिला.ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्रात ओबीसींवर झालेल्या अन्यायावर जोरदार हल्लाबोल केला.
ओबीसी आरक्षण बेकायदेशीररीत्या हडप करण्याचा प्रयत्न, खोटे कुणबी दाखले, ओबीसींवर दहशत, समाजबांधवांवर हल्ले, खून, जाळपोळ, मारहाण यांचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला. “ओबीसी भयभीत केला गेला आहे. याचा बदला घ्यायचा असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये बीसी, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्यांक यांनी एकत्र येऊन ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारांनाच मतदान केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून ओबीसीवरील अन्यायाला वाचा फोडत आहोत. आता आपली स्वतःची हक्काची, नोंदणीकृत पार्टी उभी आहे. ओबीसी बहुजन पार्टी हा ओबीसींचा ठाम राजकीय पर्याय आहे. ज्यांना उमेदवारी हवी आहे त्यांनी तात्काळ संपर्क साधावा, एबी फॉर्म घरपोच दिला जाईल. ओबीसी आरक्षण आणि हितरक्षणाची जबाबदारी आम्ही या पक्षामार्फत घेत आहोत.” शेवटी वाघमोडे वहिनी यांनी आभार मानले.
📣 सोशल मीडिया संदेश
ओबीसीवर अन्याय करणाऱ्यांना आता राजकीय उत्तर मिळणार! हक्क, आरक्षण आणि स्वाभिमानासाठी ओबीसी बहुजन पार्टी मैदानात उतरली आहे. ही लढाई हक्काची आहे, स्वाभिमानाची आहे.
📲 सोशल मीडिया सूचना
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01 – हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा बेल आयकॉन दाबा विसरू नका
#हॅशटॅग्स
#OBCबहुजनपार्टी #ओबीसीएल्गार #सोलापूर #सामाजिकन्याय #आरक्षणरक्षण #बहुजनराजकारण #दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही



