सोशल

महेश अण्णा भागवत मुरब्बी राजकारणी यांच्या उमेदवारीने प्रस्थापित उमेदवार यांची चिंता वाढली!

महेश अण्णा भागवत मुरब्बी राजकारणी यांच्या उमेदवारीने प्रस्थापित उमेदवार यांची चिंता वाढली!

ओबीसी बहुजन पार्टी बारामती लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा भागवत यांच्या प्रचाराचा शुभारंभ केडगाव चौफुला येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून पक्षाचे उपाध्यक्ष टी. पी. मुंडे, सरचिटणीस चंद्रकांत बावकर, कोषाध्यक्ष जे. डी. तांडेल, उमेदवार महेश अण्णा भागवत, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, पांडुरंग मेरगळ, दौलत ठोंबरे आदी मान्यवरांच्या
यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात करण्यात आला त्यानिमित्त भव्य मिरवणूक ढोल ताशा हलगीच्या कडकडात मान्यवरांच्या ताफ्यावर जेसीबी तून फुले उधळण्यात आली नयनरम्य दृश्य केडगाव चौफुला येथे हजारो मतदारांनी पाहिले प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.

ओबीसी बहुजन पक्षाच्या राजकीय लढाईचा प्रारंभ देशाच्या हाय व्होल्टेज बारामती लोकसभा मतदारसंघातून होत आहे, याचा विशेष आनंद आहे. या लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या प्रस्थापितांना ओबीसी, भटक्या विमुक्त अनुसूचित जाती, मुस्लिम मतदार धडा शिकवतील. ही राजकीय लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने सर्वसामान्यांचे प्रतिनिधी महेश भागवत यांना विजयी करावे,” असे आवाहन शेंडगे यांनी केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली सर्वांनी एकजुटीने महेश यांना भागवत यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

>महेश अण्णा भागवत यांचा अल्पसा परिचय>>>>

🔵 उमेदवाराचा परिचय
1)1990 या वर्षी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ग्रामपंचायत लिंगाळी सदस्यपदी निवड.
2) 1992 ते 1997 आणि 2007 ते 2014 या कालखंडात संचालक भीमा सहकारी साखर कारखाना पाटस.
३) संस्थापक, भाऊसाहेबनगर विविध कार्यकारी सोसायटी माळवाडी भाऊसाहेबनगर.
४) विद्यमान अध्यक्ष गोपाळकृष्ण दूध उत्पादक संस्था माळवाडी.
५) 1995 ते आज पर्यंत संस्थापक अध्यक्ष, श्री सरस्वती शिक्षण संस्था माळेवाडी.
६) संस्थापक संचालक, सुभाष अण्णा कुल दौंड तालुका दूध उत्पादक संघ, गलांडवाडी.
७) सन 2007 ते 2008 या कालखंडात सुभाष अण्णा कुल दौंड
तालुका दूध उत्पादक संघ अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 14 वर्षे प्रांतिक प्रतिनिधी होते. विशेष निमंत्रित सदस्य, भाजपा पुणे जिल्हा.
९) खडकवासला पाणी वाटप कृती समिती मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत.
१०) राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दौंड महाविद्यालयातून राष्ट्रीय स्तरावर निवड.
११) शेती क्षेत्रात पीक पद्धतीत सुयोग्य नियोजन करण्यासाठी अभिनव योजनेचा अवलंब करण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न.
12) अध्यक्ष, रोटरी क्लब कुरकुंभ
औद्योगिक वसाहत, दौंड.
१३) दौंड रायझिंग मॅरेथॉनचे मुख्य निमंत्रक.
गेल्या ५ वर्षात २५०००० पेक्षा अधिक स्पर्धकांचा भव्य कार्यक्रम प्रकल्प स्थापित करण्याची चांगली क्षमता.
१४) प्रकल्प व्यवस्थापन आणि सरकारी सेवा व्यवस्थापित करण्यात तज्ञ मार्गदर्शक.

🔵छंद- वाचन, संगीत, क्रिकेट

🔵जोडीदाराचे नाव – सौ.मेघा (वहिनी) महेश
भोपळे-भागवत

🔵वडीलांचा परिचय
कै.सिताराम विठ्ठलराव उर्फ भाऊसाहेब भागवत
१) माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे
२) माजी सभापती दौंड तालुका पंचायत समिती दौंड
३) माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे
४) माजी संस्थापक संचालक भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड मधुकरनगर पाटस
५) माजी संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई
६) प्रथम माजी सरपंच ग्रामपंचायत लिंगाळी
७) माजी चेअरमन दौंड विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड दौंड.

🔵परदेश अभ्यास दौरा
चीन ,ऑस्ट्रेलिया,जर्मनी, तैवान, थायलंड, व्हिएतनाम,मॉरिशस, नेपाळ, बेल्जियम, स्विझर्लंड,घाना, फ्रान्स, नेदरलँड इत्यादी.

सहकार,शिक्षण, आरोग्य, क्रिडा, शेती या क्षेत्रातील 35 वर्षाचा अनुभव असलेला दूरदृष्टी सर्व गुणसंपन्न उमेदवार माननीय महेशअण्णा सिताराम भागवत यांना प्रचंड मताने विजयी करा!

शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा आपल्याकडील महत्त्वाच्या बातम्या समाज उपयोगी लेख फोटो व्हिडिओ ज्या बातम्यांची कोणी दखल घेत नाही अशाही बातम्या आपण आमच्याकडे पाठवा त्यांना प्रसिद्ध देण्याचा जरूर प्रयत्न करू

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button