ओबीसी नेतृत्व मा. प्रा. लक्ष्मणराव हाक्के, यांचा जत तालुका दौरा उत्स्फूर्तपणे यशस्वी झाला तुकाराम माळी

ओबीसी नेतृत्व मा. प्रा. लक्ष्मणराव हाक्के, यांचा जत तालुका दौरा उत्स्फूर्तपणे यशस्वी झाला
तुकाराम माळी
जत दि.१५जुलै २०२४
जालना जिल्ह्य़ातील वडीगोद्री येथे ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी प्रा.लक्ष्मण हाक्के आणि नवनाथ वाघमारे दहा दिवस उपोषणास करून
राज्य सरकारकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते.
ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयाकडून मिळाले .
कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात याव्यात.
ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाना आर्थिक तरतूद व्हावी.
ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्हात योजना कार्यान्वित व्हावी.
ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी.यासाठी राज्य सरकारच्याकडून आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, केले होते.
ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केल होत.
मंत्री छगन भुजबळसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली.
बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब बोलताना म्हणाले की, आमच्यावरचा अन्याय कधी संपणार? आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावेत यासाठी आरक्षण आहे. यापुढे तुम्ही सगळे एकत्र राहिला तर तुमचं आरक्षण टिकेल. हातावर हात ठेवून बसलात तर काही होणार नाही. यापुढे लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होणार.
काही जण ओबीसी प्रवर्गातून आणि १० टक्क्यातूनही आरक्षण घेतात. खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार. ओबीसींना प्रमाणपत्र हवं असेल तर १० महिने थांबावं लागलं.
आपल्याला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी उभं राहिचे आहे. दलित आदिवासी समाज तुमच्यासोबत आहे. राज्यात अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटले. ज्यांनी खोटे दाखले वाटले, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. खोटे दाखले पुन्हा एकदा तपासले जाणार. खोटे दाखले देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार.दाखले देण्याचे पूर्वीचे जे नियम आहेत, ते सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार आहेत.कोणतेही असंवैधानिक नियम करू नयेत. अशी खंबीर भूमिका घेऊन ओबीसी वर्गाचा लढा यशस्वी लढल्याबदल त्याचे भव्य स्वागत जत तालुक्यात करण्यात आले.
.
जत शहरात क्रीडा संकुल जवळ रॅली आल्यानंतर प्रा.लक्ष्मणराव हाक्के सर यांचे स्वागत तुकाराम माळी यांनी तर प्रकाश आण्णा शेंडगे यांचे स्वागत परशुराम मोरे यानी केले रॅली मध्ये चार चाकी वाहनासह दुचाकी वाहनस्वार मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरात रॅली पंचायत समिती,शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पेठ,संभाजी चौक,किस्मत चौक,लोखंडी पूल, मंगळवार पेठ गांधी चौक,बनाळीकर चौक,राणाप्रताप चौक, बसवेश्वर पुतळा उमराणी रोड जवळील भटक्या विमुक्त वसाहत येथे शोषित वंचित दुर्बल समाज जीवन मान यांची विचारपूस करून या समाजाचे गाडे अभ्यासक प्रा.लक्ष्मणराव हाक्के सर यांनी मार्गदर्शन कले.आरळी कॉर्नर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून बुध्द,बसवण्णा,फुले, शाहु,आंबेडकर यांचे विचार समाजात रूजवून देशातील दुर्बल घटकाचा विकास करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी तुकाराम माळी,शंकरराव वगरे, , ,राजेंद्र कोळेकर,परशुराम मोरे,नागनाथ मोटे,दिनकर पतंगे, तम्मा कुलाळ, तायाप्पा वाघमोडे,मल्लिकार्जुन औरसगे,रमेश माळी,अनिल मिसाळ,आशाराम चौगुले,संतोष मोटे,सुनील माळी,गोपाळ पाथरूट, राजेंद्र आरळी,हाजीसाहेब हुजरे ,,गंगाधर देवकते, संदीप मदने, संतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते.




