मंगळवेढा बालाजी नगर समाज मंदिरामध्ये बेकायदेशीर पतसंस्थेविरुद्ध बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे बेमुदत आंदोलन एकच भिडू.. बच्चू कडू!!!

मंगळवेढा बालाजी नगर समाज मंदिरामध्ये बेकायदेशीर पतसंस्थेविरुद्ध बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे बेमुदत आंदोलन
एकच भिडू.. बच्चू कडू!!!
बालाजी नगर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे बंजारा समाजासाठी बांधण्यात आलेल्या समाज मंदिरामध्ये बेकायदेशीर पतसंस्था चालू असून त्याचा कोणताही करार शासकीय अधिकाऱ्यांशी झाला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना खास करून मंगळवेढा बीडीओंना, तहसीलदार,पोलीस स्टेशन ग्रामपंचायत सेवक,लोकप्रतिनिधी आमदार यांना निवेदन देऊनही बंजारा समाजातीलच एका पतसंस्था चालकाने बेकायदेशीर पतसंस्था चालू ठेवली आहे.याचा त्रास समाजातील लोकांना होतो समाज मंदिराचा वापर समाजाला करता येत नाही.म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने त्यांच्याविरुद्ध आणि इतर मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन प्रांत कार्यालय मंगळवेढा येथे चालू केले आहे.
संस्थेचे पदाधिकारी यावेळी बोलताना म्हणाले,बच्चू कडू हे जातीवादी नाहीत ते अपंग,अनाथ, विधवा,शेतकरी यांचे प्रश्न घेऊन नेहमीच आंदोलन करतात. यावर शिवक्रांती टीव्ही संपादकांनी प्रश्न विचारला, तारापूर नाला पंढरपूर येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी ओबीसी समाजाच्या विलास किशन क्षीरसागर या 28 वर्षीय तरुणाचा खून करून त्यांनी स्वतः आत्महत्या केल्याचे दाखवले आहे त्याचे काय?
यावर प्रहार संघटनेच्या अध्यक्षांनी अपंग माणसाचा खून हा आमच्यासाठी गौण असल्याचे सांगितले. प्रहार संघटना हि अवैध धंदे शोधून काढून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे काम करत आहे.
विकास कामांचा कोणताही अजेंडा त्यांच्याकडे दिसत नाही. हे आंदोलन आर्थिक व्यवहाराशी निगडित असल्याचे दिसून येत आहे.
बच्चू कडू यांनी जातीवादी जरांग्यांच्या अंतरवाली सराटी येथे जाऊन अनेक वेळा एका जातीच्या जातीवादी बेकायदेशीर मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्याचे काय?
त्यावेळेला या प्रहार संघटनेच्या प्रमुखांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन बच्चू कडूंच्या कार्यास पाठिंबा दिला. यावरून या संघटनेचे पदाधिकारी तरुणांना वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचे काम बच्चू कडू करत असल्याचे निदर्शनास आले. वेगळ्या दिशेने वाम मार्गाला लावण्याचा कार्यक्रम बच्चू कडू करीत असल्याचे निदर्शनास आले.
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


