पुणे “महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन”चे पूर्ण नाव जाहीर करा व मंत्रालयातून गायब झालेली महात्मा फुले प्रकल्प दस्तऐवज तात्काळ शोधा — फुले प्रेमी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन


1 1🔴 दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
पुणे महात्मा फुले मंडई चे नाव मेट्रो स्टेशनला द्या मागणीचे निवेदन देताना व्हिडिओ
पुणे “महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन”चे पूर्ण नाव जाहीर करा व मंत्रालयातून गायब झालेली महात्मा फु rले प्रकल्प दस्तऐवज तात्काळ शोधा — फुले प्रेमी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
📌 बातमी:
पुण्यातील “मंडई मेट्रो स्टेशन”चे अपूर्ण नाव बदलून “महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन” असे पूर्ण स्वरूपात तात्काळ घोषित करावे, तसेच २ डिसेंबर रोजी मंत्रालयातून गायब झालेली महात्मा फुले डॉक्युमेंटरी, हस्तलिखिते व प्रकल्प फायली त्वरित शोधून काढाव्यात, या मुख्य मागण्यांसह फुले प्रेमी अखिल भारतीय माळी महासंघाने आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार निवेदन सादर केले. “मंडई” हे अपूर्ण नाव ठेवून महात्मा फुले यांच्या ऐतिहासिक वारशाचा अपमान होत असून यामागे इतिहास पुसण्याचा गंभीर प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. जिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन पाठवण्यात आले. निवेदन सादर करताना राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या सोबत बापूसाहेब भंडारे, कमलताई गायकवाड, मारुती ढगे, प्रियंका विठ्ठल रेड्डी, डॉ. माधुरी पारपल्लीवार, राजू भंडारे, बजरंग शेंडेकर, किशोर रणदिवे, दीपक गायकवाड, माधवी पोतदार, काशिनाथ पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते.
📲 दिनबंधू न्यूज व शिवक्रांती टीव्ही
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे — 73 87 37 78 01
हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
बातमी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड करा व कमेंट करा.
बेल आयकॉन दाबायला विसरू नका!# देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
#दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीटीव्ही #महात्मा_फुले #सावित्रीबाईफुले #महात्मा_फुले_मंडई #PuneMetro #फुलेप्रेमी #अखिलभारतीयमाळीमहा संघ #सत्यशोधकशंकररावलिंगे #SolapurNews #MaharashtraUpdates #SocialJustice #PhuleMovement #मंदईमेट्रोस्टेशन #PhuleHistory #OBC #SocialReform #जिल्हाधिकारी_सोलापूर #DevendraFadnavis #BreakingNews #LatestUpdate



