श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांचे अपघाती निधन

श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांचे अपघाती निधन
भारतनामा पैठण (प्रतिनिधी)
राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊसाहेब गुलदगड, हल्ली राहणार (नागरदेवळे नगर) यांचे शनिवार दि. २३ मार्च २०२४ रोजी रात्री १० वाजे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथुन राहुरीकडे मोटरसायकलवर येत असताना उड्डाण पुलाचे रस्त्याचे काम चालू असल्याने मोटरसायकलची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.
सामाजिक चळवळीत फार थोडे तरुण स्वतःला वाहून घेतात त्यापैकी सचिन भाऊ हे होते. भविष्यात सचिन भाऊ सारखे युवक या मातीत निर्माण व्हावे यासाठी सचिन भाऊंच्या संपूर्ण कुटुंबाला आपण साथ द्यावी. हीच खरी सचिन भाऊंना भावपूर्ण आदरांजली ठरेल. महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊ गुलदगड यांना अखेरचा जय सावता… राहुरी येथील गणपती घाटयेथे अंत्यसंस्कार करण्यात आले सचिन गुलदगड हे श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष होते. सामजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. एखाद्या विषयावर रोख ठोक भूमिका घेवून आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे व्यक्तिमत्त्व अलीकडच्या काळातील पिढीत शोधून सापडत नाहीत. फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांवर काम करत असताना नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात श्री संत सावता माळी युवक संघाच्या माध्यमातून मोठे संघटन उभे करण्यात सचिन भाऊला कमी वयात यश मिळाले. सर्वसामान्य
कुटुंबातील लढवय्या युवक केवळ आपल्या कणखर आवाजाच्या जोरावर व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचे भूषण लोकनेता झाले. राहुरी मायभूमीचे नाव राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचवले. समाजाचे काम करत असताना स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार केला नाही. स्वहित किंवा कुटुंबाचा विचार न करता अडचणीत असणाऱ्या समाजातील ऊपेक्षित घटकांसाठी जसे शक्य होईल ते काम सचिनभाऊ यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. सचिन भाऊ गुलदगड यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज या रण गावाला अ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा कारण चा विकास व्हावा सावता महाराज यांची कर्मभूमी जन्मभूमी सर्व महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज माळी समाज यांना माहीत व्हावा त्यांचे विचार आचार सर्व पर्यंत पोहोचावेत सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा भडेवाडा या शाळेचा जोरदार व्हावा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा अनेक विषयावर ओबीसी समाज जात निहाय जनगणना व्हावी अशा अनेक विषयावर त्यांनी मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदा घेऊन जनजागृती करून आवाज उठवला आहे महाराष्ट्रामध्ये सावता सेना वाढवण्याचा प्रयत्न करून तरुणांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून अंधश्रद्धेच्या पाठीमागे न लागता सावता महाराजांचे विचार तरुणांना देण्याचा प्रयत्न त्यांनी वारंवार केलेला आहे समाजामध्ये एकीरावी समाजाचा विकास व्हावा समाजाला राजकीय पटलावर स्थान मिळावं अशा अनेक विषयावर त्यांनी आंदोलने मिळावे घेतलेले आहेत आणि स्वतः त्याचे नेतृत्व केलेला आहे हे त्यांचं वय आपल्यातून निघून जाण्याचं नव्हतं तरीपण जो आवडतो सर्वांना तोच आवडतो निर्मिकान निर्मिका आणि त्याच्यावर घाला घातला या निसर्गनीती पर्याय नाही निर्माण करतेस मी विनंती करतो हे त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी
आज सचिन भाऊ नाव असलेले लोकनेते आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही. परंतु काळाने झडप घातल्याने सचिन भाऊंचे गुलदगड कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सचिन भाऊच्या जाण्यान जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून निघणारी आहे. समाजातील प्रत्येक घटकातील युवकांची सचिन भाऊंच्या जाण्याने सामाजिक कामाची जबाबदारी वाढली आहे. सचिन भाऊंच्या कुटुंबाच्या पाठीशी ताकतीने उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सचिन भाऊ कुणाच्याही अडचणीत भक्कम पणे उभे राहत असत. जो दुसऱ्यांचा आधार होता. आज त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आपल्यावर आली आहे. सचिन भाऊ गुलदगड यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


