प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने आदिवासी वयोवृद्ध विधवा महिलेचे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी दि.१७ सप्टेंबर २०२४ सकाळी १० वाजलेपासून अहमदपूर तहसील कार्यालयासमोर होणार अमरण उपोषण !

प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने आदिवासी वयोवृद्ध विधवा महिलेचे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी दि.१७ सप्टेंबर २०२४ सकाळी १० वाजलेपासून अहमदपूर तहसील कार्यालयासमोर होणार अमरण उपोषण !
– पत्रकार परिषदेत लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी दिली माहिती.

अहमदपूर :- सिलिंग मध्ये शासनाने दिलेल्या जमिनीतील मुरूम विकून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चावरे तिघा बंधू वर कार्यवाही करून न्याय आणि संरक्षण मिळणे बाबत श्रीमती रुक्मीणबाई महादू कार्लेवाड यांचे अहमदपूरच्या तहसील कार्यालयासमोर मराठवाडा मुक्ती दिन दिनांक १७ सप्टेंबर २०२४ पासून आमरण उपोषण होणार असल्याची माहिती लोकाधिकारप्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी अहमदपुर येथे पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस अन्यायग्रस्त वयोवृद्ध विधवा आदिवासी महिला श्रीमती रुक्मीणबाई महादू कार्लेवाड, लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके, लोकाधिकार संघाचे अहमदपूर तालुकाप्रमुख विठ्ठलराव तरडे, रुक्मीन बाईंच्या दोन मुली आणि जावई नवनाथ महाराज भानगिरे हे उपस्थित होते.
पत्रकार परिषद झाल्यानंतर याबाबतचे निवेदन अहमदपूरच्या तहसीलदार यांना लोकाधिकार संघाचे पदाधिकारी आणि रुक्मीनबाई महादू कार्लेवाड यांनी प्रत्यक्ष भेटून तहसील कार्यालयात दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ वार गुरुवार रोजी दुपारी दिले आहे.
निवेदनामध्ये खालील प्रमाणे मजकूर आहे.
मी श्रीमती रुक्मीणबाई महादू कार्लेवाड मी. गुंजोटी ता.अहमदपूर जि.लातूर येथील रहिवाशी असून मी विधवा आदिवासी समाजाची आणि ८५ वर्षे वयाची वयोवृध्द महिला आहे. माझ्या कुटुंबाला सन १९७६ साली शासनाने सिलींग अंतर्गत गुंजोटी शिवारातील जमीन गट क्र. १६७ मधील ०१ हे ०१ आर जमीन दिलेली आहे.
माझे पती दिनांक २८ फेब्रुवारी २०१० रोजी मयत झाले आहेत. मला माझ्या पोटी मुलगा नसून फक्त ४ मुलीच आहेत. या चारही मुली विवाह झाल्यामुळे माझ्याजवळ राहत नसून त्यांच्या नांदत्या घरी राहत आहेत. त्यामुळे मी एकटीच राहते.
माझ्या पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या नावावर असलेली जमीन वारस हक्काने माझ्या व माझ्या ४ मुलीच्या नावावर सन २०२० साली झालेली आहे.
मागच्या काळात जमीन कसण्यासाठी म्हणून माझ्या पतीने गावातील दगडू चावरे यांना दिली होती. मात्र मागील दोन वर्षापूर्वी त्यांनी माझ्या शेतातील चंदनाचे, निलगीरीचे व लिंबाचे झाडे चोरून विक्री केले आहेत. तेव्हा त्यांना विचारले असता मला दमदाटी करून गप्प बसविले तुझ्या पोटी पोरगा आहे का जास्त वळवळ केल्यास तुला खल्लास करून टाकीन’ अशी धमकी दिल्याने मी भिवून गप्प राहिले.
जुलै २०२४ मध्ये मयत दगडू चावरे यांची पत्नी सुमनबाई दगडू चावरे व त्यांचे तीन मुलांनी माझ्या जमीनीतून जेसीबी लावून लाखो रुपयाचा मुरुम विक्री केला आहे, हे समजल्यानंतर भी तहसील कार्यालयात दोन वेळा व जिल्हाधिकारी कार्यालयात एक वेळा अर्ज देऊन कळविले आहे की, संबंधित मुरुम विकणाऱ्यावर कारवाई करून माझ्या जमीनीचे केलेले नुकसान भरपाई मिळवून द्यावी व गुंडगिरी करुन माझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असलेल्या सुमनबाई चावरे व त्यांची तिनही मुले यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी व त्यांच्याकडून माझ्या जिवीताला धोका आहे. तू शेतात आलीस तर तूला शेतातच खल्लास करून टाकू, आमचे कोणीही वाकडे करु शकणार नाही अशी धमकी दिली असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
तेव्हा मे. तहसीलदार साहेबांनी मला न्याय द्यावा आणि मला सरकारने दिलेल्या जमीनीत अन्य कोणीही अतिक्रमण करु नये यासाठी संरक्षण द्यावे. अन्यथा दि. १७ सप्टेंबर २०२४ मराठवाडा मुक्ती दिनापासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसत आहे. याची नोंद घ्यावी. माझ्या जिवीताचे बरेवाईट झाल्यास प्रशासन जवाबदार राहील, असेही श्रीमती रुक्मीणबाई महादू कारलेवाड रा.गुंजोटी ता.अहमदपूर जि.लातूर ह.मु. किनगाव ता. अहमदपूर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहमदपुर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन किनगाव, लोकाधिकारप्रमुख व वृत्तपत्र प्रतिनिधी यांना देण्यात आले आहेत.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा



