ओबीसी भावनाशून्य झालाय का,?

ओबीसी भावनाशून्य झालाय का,?
ओबीसी योद्धा कै सचिन भाऊ गुलदगड यांना आमच्यातून जाऊन आज दोन दिवस होत आहेत.ओबीसींचा तळमळीचा कार्यकर्ता अपघातात जाऊनही त्या अपघाताची वर्तमानपत्रात साधी बातमीही येऊ नये यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? मग तो अपघात होता की घातपात? शेंडीच्या सरपंच लोंढे ताईंना गावातील प्रस्थापित समाजाने त्रास दिला
त्यावेळेस त्या गावात जाऊन ताईंची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचे प्रथम कर्तव्य सचिन भाऊंनी केले! महात्मा फुले वरील चित्रपट सर्वांनी पाहावा असे तळमळीने सांगणारे सचिन भाऊ, भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केसही वाकडा करण्याची ताकद कोणातच नाही असे छाती ठोक सांगणारे सचिन भाऊ, नगरचा भावी खासदार ओबीसीचाच होणार यासाठी समाज जागृती करणारे सचिन भाऊ! असा माणूस आमच्यातून गेला! समाजाची इतकी मोठी हानी झाली,
तरीही आम्ही होळीच्या शुभेच्छा एकमेकांना द्यायच्या? रंग उडवायचे का? एक दिवस शुभेच्छा दिल्या म्हणजे आमचे कर्तव्य संपले का? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघात सिन्नरला झाला म्हणतात मग भाऊ एकटेच होते का? इतक्या रात्री कोठे चालले होते ?इतर वेळेस बैल, कुत्रा, मांजराचा जीव गेला तर त्याचा व्हिडिओ काढून मोबाईल ला प्रचार करणारे महाभाग आम्ही बघितलेत! मग सचिन भाऊंची अपघाताची माहिती मोबाईलला व वर्तमान पत्रात का येऊ शकली नाही???


