प्रश्न पाण्याचा प्रश्न शेतकऱ्याचा फायदा! अधिकाऱ्यांचा

प्रश्न पाण्याचा प्रश्न शेतकऱ्याचा फायदा! अधिकाऱ्यांचा
मूळ म्हैसाळ योजना व वितरिका ही जरी अर्ध्या जत तालुक्यासाठी वरदायिनी ठरत असली तरी म्हैसाळ योजनेवर काम करणार्या अधिकार्यांसाठी वाहती गंगा बनली आहे ,वातानुकुलीत खोलीत बसून केलेले सर्व्हे ,नित्कृष्ट दर्जाची कामे ,अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण व्यवहारांमुळे म्हैसाळ योजनेचा बोजवारा उडालेला आहे ,मग ती खलाटी पंपगृह ब पासून शेड्याळपर्यंतची पाईपलाईन असो ,अथवा अंतराळपासून आवंढीपर्यंतची पाईपलाईन असो ,नित्कृष्ट दर्जाचे साहीत्य वापरून केलेले लायनिंगची कामे असो ,प्रत्येक बाबतीत प्रचंड काळाबाजार झाला आहे* ..
सर्व अधिकार्यांचे धोरण हे कंत्राटदारधार्जिने आहे ,शेतकरी हा सर्वात शेवटचा घटक बनलेला आहे ,संपूर्ण जत तालुक्यातून शेकडो कोटींची कमिशने पोहोचलेली आहेत ,अनेक अधिकार्यांनी अमाप माया जमा केली आहे ,चार वर्षापूर्वी नोकरीला लागलेला अभियंता करोडो रूपयांची मालमत्ता बाळगून आहे ,आणि जे प्रस्थापित अधिकारी आहेत ,त्यांच्या मालमत्तेचे आकडे पाहून घेरी येण्यासही हरकत नाही ..आम्ही आतापर्यंत तिकडे कानाडोळा करत होतो ,पण आता आमच्या शेतकर्यांच्या अंगावर जर हे अधिकारी पोकलेन मशिन घालणार असतील तर या अधिकार्यांचे सोलापूर ,पुणे ,लोणावळा व टेंभुर्णी हायवेवरील अनेक बेनामी व नामी मालमत्तांचे उतारे लाचलुचपत खात्यांकडे देण्यास काहीही हरकत नाही
शिवक्रांती टीव्ही न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


