शरणगाथा क्रमशा.37

शरणगाथा क्रमशा.37
मायेपासून मुक्त
इच्छा, मोह, प्रलोभन, आशा, विकार, वासना यांना प्रभुदेवांनी ‘माया’ म्हटले आहे. मायेवर विजय मिळविल्याचा प्रभुदेवांचा लौकिक आहे. सत्ता संपत्ती आणि कामिनी म्हणजेचे स्त्री ही माया नसून वासना हीच माया आहे. वासनेवर विजय मिळविण्याची गरज असल्याचे प्रभुदेव सांगतात.
ब्रह्माला श्रेष्ठ मानावे तर त्याला मायेने गिळले, विष्णूला श्रेष्ठ मानावे तर त्याला मायेने गिळले, रूद्राला श्रेष्ठ मानावे तर त्याला मायेने गिळले, मायेला श्रेष्ठ मानावे तर तिलाही गिळून टाकले मायेने, सारे काही तुझीच तर माया आहे देवा. तू मात्र मायेवर विजयी झालास गुहेश्वर. (समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक २२)
मायेपासून कुणीही सुटले नाही. ब्रह्म, विष्णू आणि शिव- रूद्र या त्रिमूर्तीवर ‘आदिमाये’चा प्रभाव होता. माया म्हणजे कारकत्त्व असल्याने तिच्यापासून खुद्द मायाही अपवाद नाही. अशा सर्वव्यापी मायेवर गुहेश्वरांनी विजय मिळविल्याचे प्रभुदेव म्हणतात.
बसवण्णा शरीरास देऊळ देवालय म्हणत असतील तर प्रभुदेवांनी देहास जमीन-भूमी म्हटले आहे. गोरक्षांना उपदेश करताना प्रभुदेव म्हणतात… देहरुपी जमिनीतील
चिंता नावाचे तण
मन रूपी कुदळाने खणून काढलो पाहा संसार नावाची ढेकळं फोडून, मी पेरणी केली पाहा ब्रम्हबीजाची
पृथ्वी नावाच्या विहिरीतून
वायूच्या मोटेने पाणी उपसून,
पंचेंद्रियरूपी बैलांच्या सहाय्याने
या जमिनीची मशागत करून,
समतेचे कुंपण घालून,
सदैव पहारा देत मी रोपटे सांभाळले पाहा गुहेश्वरा.
(समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक १२२९)
आपल्या देहरुपी देवळात ज्ञानरुपी रोपटे लावून त्याचे योग्य पद्धतीने संगोपन
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


