ओबीसी बांधवांनो.. आधी पाया मग कळस..!

ओबीसी बांधवांनो..
आधी पाया मग कळस..!
लोकसभेचा आखाडा सुरु झाला आणि विविध राजकीय पक्षांचे मल्ल तयारीला लागले.मात्र महाराष्ट्रातील माती आधीच मराठा ओबीसीकरणावरून तापून निघालेले आहे.अश्या तापलेल्या आखाड्यात ओबीसी समाजानेही आपला मल्ल उतरावा असा ओबीसी समाजातून सुर निघताना दिसून येत आहे.खरतर असा सुर निघणं म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्रात ओबीसी समाजाची झालेली एकजुट आणि मा.छगनरावजी भुजबळ यांनी घेतलेले ओबीसी मेळाव्यांचे हे यश आहे अस म्हणता येईल.
ज्या ज्या वेळी ओबीसी गोर गरीब बहुजन समाज संकटात सापडला,त्या त्या वेळी ओबीसीचा संकटमोचक म्हणून भुजबळ साहेबच पुढे आले.भुजबळांची लढाई ही जरांगे सारखी आज कालची नाही.महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करुन ओबीसी समाजाला आरक्षण भुजबळ साहेबांनी मिळवून दिले.मंडल आयोगासाठीच त्यांनी शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केला.
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी आपली राजकीय कारकीर्ध पणाला लावली.त्यासाठी वेळो वेळी त्याच्या झळा वेगवेगळ्या माध्यमातून भुजबळ साहेबांना सोसाव्या लागल्या आहेत.आणि त्या त्यांनी भोगल्या देखील.मात्र त्यांनी ओबीसी समाजाची साथ कधीच सोडली नाही.ओबीसी समाजाच्या जगण्याला आत्मभान आणि स्वाभिमान देण्याचे काम मा.भुजबळ यांनीच केले.
छगनरावजी भुजबळांनी कधीच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही.मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला ठेच पोहचू नका हीच त्यांची भूमिका राहिली आहे.मात्र एक मराठा लाख मराठा म्हणत..फूल जेसीपी तून आणि आरक्षण मात्र ओबीसीतून..अशी मागणी करत मनोज जरांगेनी रान पेटविले.केवळ रान च नाही तर ओबीसी सामाजाचे घर सुध्दा पेटविले.. गाव बंदी केली,महाराष्ट्रातील ओबीसी सामाज भयभीत केला.सोयमघोषित ओबीसी नेता एकही चकार शब्ध काढायला तयार होत नव्हता.ना सभागृहात ना रस्त्यावर,अशा वेळी भुजबळ नावाचा एकटाच वाघ रस्त्यावर उतरला.
त्यामुळे घाबरलेला ओबीसी सामाज बोलू लागला,आक्रोश व्यक्त करू लागला,आणि भुजबळांच्या नेतृत्वाखाली एकजुट होऊ लागला.लाखोंच्या संख्येंने ठीक ठिकाणी मेळावे पार पडू लागले. या मेळाव्यात छोट्या छोट्या समाजाचे नेते आप आपल्या संघटना बाजुला ठेऊन ओबीसी म्हणून बोलू लागले.कधीच एकत्र न येणारा ओबीसी समाज,भटक्या विमुक्तांच्या ४२ जाती जमाती,अलूतेदार,बलुतेदार मांडीला मांडी लाऊन बसू लागला हे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.
अश्या वेळी मंडल आयोगासाठी आम्ही लढलो म्हणणारे मात्र वंचित समाजाला न्याय देण्याच्या वेळी वंचीत होते. हे नोंद करता येईल.
काहीची पोटदुखी मात्र अजुन काही राहीना. *ओबीसी मेळावा हा bjp चा मेळावा होता,त्यात bjp लोक बोलत होते.असा खोडसाळपणा करणाऱ्याच्या बुद्धीची कीव येते.महादेव जानकर bjp चे आहेत काय..? प्रकाश शेंडगे bjp चे आहेत का..?,विजय वडेट्टीवार,टी.पी.मुंडे ,लक्ष्मण गायकवाड,शब्बीर अंसारी,लक्ष्मण हाके,ही मंडळी bjp ची होती का..?एकटे गोपीचंद पडळकर सोडले तर..! आणि भुजबळ साहेब राष्ट्रवादी पक्षात आहेत म्हणून याला राष्ट्रवादीचा मेळावा म्हणायचं का..?
ओबीसी मेळाव्यात सर्व पक्ष्याचे नेते होते,प्रत्येक नेत्याने आप आपले पक्ष बाजुला ठेऊन ओबीसी अडचणीत आहे म्हणून मेळाव्यात एकत्र आले होते आणि याचे नेतृत्व मा.भुजबळ करीत होते.हा मेळावा कोणत्या एका पक्ष्याचा नव्हता तर ओबीसी समाजाच्या न्याय हक्काचा होता.तुम्ही कोणत्याही पक्ष्यात असाल मात्र ओबीसी म्हणून एकत्र या..! या भुजबळ साहेबांच्या हाकेला सर्वाणी साथ दिली,हे पोटशूळाने लक्ष्यात घ्यावे.या मेळाव्यांची फलश्रुती काय झाली हे ओबीसी समाज सांगत आहे.ओबीसी आरक्षण वाचविणे हाच एकमेव हेतू होता.ही सामाजिक अस्तित्वाची लढाई होती,आणि ओबीसी सामाज ही लढाई लढला.
यावर कुणी आपली दुकानदारी चालविण्याची गरज नाही.अश्या गरमागरम वातावरणात लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.ओबीसी समाजाने आपली राजकीय महत्वकांशा व्यक्त करीत,ओबीसी समाजाने ओबीसीलाच मतदान करावे अशी भावना ओबीसी व्यक्त करताना दिसून येत आहे आणि ते स्वाभाविकच आहे. मात्र ओबीसी भटकेविमुक्त समाज हा गोर गरीब समाज आहे.समाजातील छोटे मोठे कार्यकर्ते आप आपल्या पक्षात बांधलेले आहेत.
मा.भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यातून कुठेच राजकीय भूमिका व्यक्त केली नाही.केवळ ओबीसीना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका.उलट त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला.( मात्र तो स्विकारला नाही) परंतु भुजबळ साहेब सभागृहात असणे ही तितकेच महत्वाचे होते.
ओबीसी समाज जानकर आहे,सुज्ञ आहे.ओबीसीच्या लढाईत भुजबळ साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ,त्यांना त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भुजबळ साहेबांना डोळ्यासमोर ठेऊनच ओबीसी मतदान करतील हे मात्र नक्की.
भुजबळ साहेबांनी पक्ष काढावा ओबीसी उमेदवार उभे करावे अशा अपेक्षा आज ओबीसी समाजाकडून व्यक्त केल्या जात आहेत आणि ते स्वाभाविक आहे.भुजबळ साहेब ज्या पक्षाचे नेते आहेत ते त्या पक्षाचे राज्याचे नेतृत्व करित आहे स्वाभाविकच त्यांना पक्षाचा आदेश मानावा लागेल .आज ती परिस्थिती नाही की साहेबांनी पक्ष काढावा म्हणून आज ज्या ठिकाणी साहेब आहे ते योग्य आहे.योग्य वेळ आल्यावर साहेब निर्णय घेतील.
आता प्रश्न हा राहतो की ओबीसी समाजाचे प्रतिनिधी लोकसभेत असावे का ?तर नक्कीच असायला पाहिजे कारण ओबीसींचा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत चर्चेला जाईल त्यावेळी ओबीसींच्या हिताची बाजु मराठा सदस्य मांडु शकतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.त्यामुळे आपल्याला ही लोकसभा निवडणूक लढवावीच लागेल आणि लोकसभेत आपले खासदार पाठवण्याची जबाबदारी ही आपली आहे.या प्रक्रियेत भुजबळ साहेबांची भुमिका ही त्यांच्या पक्षाशी असेल ते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अथवा कोणतीही मदत करणार नाही ते पक्षाचा आदेशाचे पालन करतील.तसेच ओबीसी समाजातील प्रस्थापित नेते ही आपल्या प्रचार यंत्रणेत कुठेच नसतील ते पण त्यांच्या पक्षाचे काम करतील अशा वेळी ही निवडणूक आपल्या सारख्या सर्व सामान्य ओबीसी,एस सी,एस टी, व्हीजे एन टी बांधवांना हातात घ्यावी लागेल .
आपल्याला जर आता स्वतंत्र होयचं असेल हे गुलामगिरीचे ओझे टाकुन निधड्या छातीने पुढे यावे लागेल आणि ही निवडणूक पार पाडावी लागेल.या निवडणुकीत आपल्या उमेदवाराकडुन कोणतेही आर्थिक अपेक्षा न ठेवता लोकवर्गणीतून निवडणूक करावी लागेल.नगर दक्षिण मध्ये ओबीसी,एस सी ,एस,टी,एन,टी,व्हीजेएनटी समाजाची संख्या ही १०८५००० इतकी आहे आपण जर ठरवले तर नक्की आपला उमेवार विजयी होईल . शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा


