सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.133

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.133

ठोसर देवराव कृष्णराव

(मृत्यू सुमारे १८९५)

महात्मा फुले यांचे एक अनुयायी, सत्यशोधक समाजाचे एक झुंजार कार्यकर्ते देवराव कृष्णराव ठोसर हे मूळचे नाशिक शहराजवळील गंगापूरचे मूळ रहिवासी होत. दरम्यान, त्यांचे शिक्षण पुणे येथे १८४७ मध्ये झाल्याने ते पुढे पुणे येथील वेताळ पेठेत स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण १८४७ मध्ये पूर्ण झाले. सत्यशोधक देवराव ठोसर जात्याच प्रतिभावंत असल्याने त्यांनी शिक्षण घेताना एक उत्कृष्ट निबंध लिहिला. हे इंग्रजी निबंध रेव्हरंड मिचेल साहेबांच्या पसंतीस उत्तरला. मिचेल साहेबांनी ‘न्यू टेस्टमेंट’ ग्रंथ देऊन देवराव ठोसरांना पुरस्कृत केले.

पुढे देवराव ठोसर पोलिस खात्यात रुजू झाले. त्यांनी पुणे, सातारा आदी ठिकाणी नोकरी केली. सातारा येथे ते फौजदार होते. पोलिस खात्यात त्यांनी चांगले कसब दाखविले. विशेषतः सन १८५७ च्या उठावात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याने इंग्रज सरकारने मानाची तलवार देऊन त्यांचा गौरव केला. पुढे पोलिस खात्यातून निवृत्त झाल्यावर ‘पुणे पोलिस’ खात्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

दरम्यान, ऑनररी मॅजिस्ट्रेट व मॅजिस्ट्रेट आदी बहुमानही सरकारच्या वतीने त्यांना देण्यात आले. देवराव ठोसर हे डेक्कन असोसिएशन, पुणे या संस्थेचे सदस्यही होते. २७ सप्टेंबर १८८५ रोजी सयाजीराव महाराजांनी बडोदे येथे मानपत्र देऊन देवरावांना गौरविले.

सत्यशोधक देवराव ठोसरांचे वास्तव्य पुणे येथील वेताळपेठेत होते. जवळील गंजपेठेतील महात्मा फुले यांच्याकडे त्यांचे येणे-जाणे होते. पुणे येथील सर्व सत्यशोधकांशी त्यांचा चांगला स्नेह होता. देवराव ठोसर सच्चे समाजियन असल्याने त्यांनी आपल्या अपत्यांचे लग्न सत्यशोधक मते लावले. सत्यशोधक तुकाराम हनुमंत पिंजण, अॅड. बापूराव रामचंद्र आवटे आणि ‘दीनबंधु’ कार वासुदेवराव बिर्जे हे ठोसरांचे तिन्ही जावई बिनीचे सत्यशोधक होते. पुत्र लक्ष्मणराव ठोसर आणि कन्या तानुबाई वासुदेवराव बिर्जे याही कडव्या सत्यशोधक होत्या. संपूर्ण आप्तांना सत्यशोधकी सूत्रात बांधणाऱ्या या ज्येष्ठ सत्यशोधकाचे

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button