सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 55

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 55
12वी परिषद आकोट येथे भरली. या परिषदेचे अध्यक्षस्थान ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांनी भूषविले. खाजोने याप्रसंगी माळी शिक्षण परिषदेचे सचिव असल्याने त्यांनी प्रस्तुत परिषद यशस्वी करण्यास हरएक प्रयत्न केले होते. खाजोने यांचे ऑक्टोबर १९५० मध्ये निधन झाले.
संदर्भ – १. अ. भा. माळी शिक्षण परिषद – सतीश जामोदकर, २. करजगावातील सत्यशोधक चळवळ सतीश जामोदकर
खिंवसरा मंगल रामलाल (जन्म ३ मे १९५७)
मंगल खिवंसरा या औरंगाबाद येथील कट्टर सत्यशोधकी कार्यकर्त्या असून त्यांचा जन्म ३ मे १९५७ रोजी मौजे राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्या उच्चविद्याविभूषित सत्यशोधिका असून, तडफदार पत्रकार आहेत. वृत्तपत्रे आणि स्त्रीमुक्ती चळवळीत त्या सक्रिय आहेत. मराठी वृत्तपत्रात त्यांनी सातत्याने लेखन केले आहे.
सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षा क्रांतिमाँ सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावरही त्यांचे लेखन उपलब्ध आहे. त्या साधारणतः १९९५ पासून सत्यशोधक चळवळीत सक्रिय आहेत. त्या केंद्रीय कार्यकारिणीच्या जवळपास बारा वर्षे सदस्या होत्या. सत्यशोधक समाजाच्या वतीने आयोजित अधिवेशन आणि साहित्य संमेलनात त्यांनी अनेकदा सत्यशोधकी विचार मांडले आहेत.
खोडके श्री. मा.
(जन्म २१-४-१९३०)
व्यवसायाने इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असलेले सत्यशोधक श्री. मा. खोडके यांचा जन्म मौजे सव, तालुका चिखली, जिल्हा बुलडाणा येथे २१ एप्रिल १९३० रोजी झाला. प्राध्यापक खोडके हे अकोला जिल्हा सत्यशोधक शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. अकोला येथे पार पडलेल्या अ. भा. ३० व्या सत्यशोधक अधिवेशनाच्या (२७ व २८ जानेवारी २००१) यशस्वीतेसाठी त्यांनी आपल्या परीने परिश्रम घेतले. श्री. मा. खोडके यांनी विविध विषयांवर लेखन केले असून ‘गीता: एक बहुजनघातक तत्त्वज्ञान’, ‘उपेक्षिताची अस्मिता’ आणि ‘नामदेवे रचिला पाया’ आदी त्यांची सत्यशोधक मतांची प्रथसंपदा आहे. विविध ठिकाणी पार पडलेल्या सत्यशोधक अधिवेशने आणि साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सत्यशोधक कार्यकर्ता लेखक म्हणून गौरव करण्यात आला आहे.
खोंड
नथ्थूजी आनंदराव
(जन्म २-१-१९०२-मृत्यू ११-१२-१९९९)
नथ्यूजी आनंदराव खोड़ पाटील हे मौजे बेलोरा, तालुका मोशी, जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक होते. १ जानेवारी १९०५ रोजी बेलोरा येथे शाहीर भीमराव महामुनींचा ‘भीमपुराण’ जलशा झाला. या जलशापासून बेलोरेकरांनी प्रेरणा घेऊन, पुढे बेलोरा येथे दोन जलसे निघाले. यापैकी एका सत्यशोधकी
जलशात नथ्थूजी पाटील सत्याजीची भूमिका करायचे. या जलशात शंकरराव विधाते नाच्याची भूमिका करायचे. त्र्यंबकराव जोशी पेटीवादक होते. श्यामराव नारायणजी राऊत, अजबराव राऊत आदी कलाकार
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




