सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.105

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.105

अर्जुनराव केळुसकर आणि सीमियन बेंजामिन यांची हिंदू आणि ख्रिश्चन धर्मावरील व्याख्याने संपन्न होत असत.

या व्याख्यानांतून दोन्ही धर्मातील तत्त्वज्ञानावर खल होत असे. या व्याख्यानांना श्रोता म्हणून उपस्थित असलेल्या भास्करराव जाधवांवरील सनातनी विचारांचा पगडा कमी होऊन ते पुरोगामी विचारांकडे आकृष्ट होऊ लागले. दरम्यान, याच सुमारास त्यांना अय्यावारूंच्या निवासस्थानी महात्मा फुले यांचे विचार ऐकावयास मिळाल्याने त्यांचा कल सत्यशोधक समाजाकडे होऊ लागला. पुढे ते राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारातील एक महत्त्वाचे कारभारी झाल्यावर ते कट्टर सत्यशोधक बनले. या बिनीच्या सत्यशोधकाला करवीर नरेश राजर्षी शाहू महाराज आणि तमाम सत्यशोधक ‘जाधवराव’ म्हणून आदरार्थी पल्लेदार हाक मारीत असत. इ.स. १८८७ साली अय्यावारू यांनी ‘ख्रिस्ती बंधुजनांस विनंती’ शीर्षकाची पुस्तिका लिहून प्रसिद्ध केली. प्रस्तुत पुस्तिकेवर महात्मा फुले यांनी एकांगी आणि लेखक अय्यावारूंवर वैयक्तिक टीका केली होती. अशा या महत्त्वपूर्ण पुस्तिकेची पांडुलिपी प्रत भास्करराव जाधवांनी तयार केली होती. या पुस्तिकेची प्रूफेही जाधवांनीच तपासली होती.

पुणे येथील एक नामांकित वकील आणि सत्यशोधक समाजाला आरंभी मदत करणारे गंगारामभाऊ म्हस्के यांनी १८९५ साली भास्करराव जाधवांची शिफारस राजर्षी शाहू महाराजांकडे केली. या शिफारशीनुसार दि. १ जून १८९५ रोजी भास्करराव जाधव सहायक सरसुभे म्हणून कोल्हापूर संस्थानाच्या सेवेत रुजू झाले होते. भास्करराव जाधव कोल्हापूर संस्थानात रुजू झाल्यानंतर वेदोक्त प्रकरण उद्भवले. वेदोक्त प्रकरणात सनातनी पत्रे राजर्षी शाहू महाराजांवर सनातनी पद्धतीने लेखन करू लागली. या प्रसंगी मुंबईहून प्रसिद्ध होणारे ‘दीनबंधु’पत्र बंद पडले होते. वेदोक्त प्रकरणातील शाहूंची भूमिका जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून दीनबंधु पत्राचे पुनरुज्जीवन करून ‘मराठा दीनबंधु’ पत्र त्यांनी सन १९०१ मध्ये सुरू केले. प्रस्तुत पत्र बळवंतराव माधवराव राणे आणि दाजीराव विचारे आदींच्या सहकार्याने जाधवरावांनी १९०३ पर्यंत कोल्हापूरहून प्रसिद्ध केले.

भास्करराव जाधव यांनी पुढे १९०४ ते १९१८ पर्यंत कोल्हापूर नगर परिषदेच्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहिले. पुढे १९२१ साली वयाच्या ५४व्या वर्षी कोल्हापूर दरबारातून ते सेवानिवृत्त झाले. इ. स. १९२३ साली सातारा जिल्ह्यातून ब्राह्मणेतर पक्षाकडून उभे असलेले जाधव निवडणुकीत
विजयी झाले. दरम्यान, मुंबई राज्याचे अबकारी आणि शिक्षण मंत्रिपदही त्यांच्याकडे चालून आले. १९३०-३१सालच्या लंडन येथील गोलमेज परिषदेतही त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला. इ. स. १९३१-३४ च्या कालखंडात पुन्हा एकदा ते आमदार म्हणून निवडून आले. इ. स. १९३५ नंतर मात्र त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेतली. ते सातारा येथे काही वर्षे वास्तव्यास गेले. सातारा येथे त्यांनी काही वर्षे वकिली व्यवसायही केला.

भास्करराव जाधव यांचा कल लेखनाकडे असल्याने त्यांनी-दीनबंधु, मराठा दीनबंधु, दीनमित्र, राष्ट्रवीर या पत्रांमधून वारंवार लेखन करून सत्यशोधक चळवळ गतिमान केली.

भास्करराव जाधव हे चतुरस्र सत्यशोधक लेखक असून ‘रामायणावर नवा प्रकाश’ हा त्यांचा महत्त्वाचा सत्यशोधकी ग्रंथ असून ‘रामायणावर’ त्यांनी सत्यशोधकी दृष्टीने नवा प्रकाश टाकला आहे. पुढे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या बत्तिसाव्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद भास्करराव जाधवांनी भूषवले. याप्रसंगी ‘मराठे व त्यांची भाषा’ या विषयावर त्यांचे एक व्याख्यान झाले होते. याच भाषणाचे इ. स. १९३२ साली ‘मराठे आणि त्यांची भाषा’ या शीर्षकाचे दासराम (रामचंद्र बाबाजी जाधव) यांनी प्रकाशक म्हणून प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध केले होते. या ग्रंथाला शा. सं. भोसले यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. या ग्रंथात मराठा समाजाचा प्राचीन इतिहास नोंदविला असून मराठे हे आर्य असल्याचे मतही भास्कररावांनी सप्रमाण नोंदविले आहे.

भास्करराव जाधवांनी अनेक सत्यशोधक ग्रंथांना मौलिक प्रस्तावना लिहिल्या आहेत. १९१३ साली प्रसिद्ध झालेल्या दीनमित्रकार मुकुंदराव पाटलांच्या ‘कुळकर्णी लीलामृत’ या खंडकाव्याला भास्करराव जाधवांची मौलिक प्रस्तावना लाभली. महात्मा फुले यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ विसाव्या शतकाच्या आरंभी दुर्मिळ झाला होता. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती दासराम यांनी १५ फेब्रुवारी १९३८ रोजी प्रसिद्ध केली.

या प्रसिद्धीमागील प्रेरणाही जाधवांचीच आहे. या आवृत्तीत ‘शिरकाव’ या सदराखाली जाधवांनी वाचकांना ग्रंथाचा परिचय करून दिला आहे. इ. स. १९३३ साली सत्यशोधक समाजाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ’ एक कोल्हापूरकर सत्यशोधक माधवराव बागल यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झाला. सत्यशोधक चळवळीवरील या चिंतनपूर्ण ग्रंथालाही भास्करराव

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button