राजकारण

समता शांतता आणि सत्यशोधक म्हणजे काय

*समता शांतता आणि सत्यशोधक म्हणजे काय हे दाखवून दिलं 17 /11/ 2023 च्या ओबीसी मेळाव्याने आपला महाराष्ट्र* हा समतेच्या हम रस्त्याने चालणार राज्य आहे आणि अशा राज्यामध्ये गेले काही दिवसापासून न भूतो न भविष्य अशा घटना घडत आहेत आणि त्याला जबाबदार कोण हा फार मोठा संशोधनाचा विषय नसून प्रत्येकाला समजत आहे त्यामुळे जो तो प्रत्येक प्रस्थापिताकडे कोणत्या नजरेने पाहत आहे हे सांगण्याची गरज नाही परंतु संयम आणि शांततेने नांदणारा येथील प्रत्येक महाराष्ट्रीय आहे अशातच ज्याची हाव कितीही असलं तरी भागत नाही आणि सर्व काही पाहिजे ते आम्हालाच पाहिजे अशा वृत्तीचे काही लोक ही शांतता भंग करण्याच्या मार्गावर सतत असतात आणि ती यशस्वी होऊन त्यांना हवा तसा प्रकार आणि तोच प्रकार गेल्या काही दिवसात घडला आणि उफळून आला संपूर्ण महाराष्ट्रभर अशांतता निर्माण झाली आणि त्यांच्या एका गटाला पुढे करून त्या गटाला गटाला असे असे भासवून दिले की आम्हाला आजपर्यंत काहीच भेटलं नाही त्यातील काही गरीब आहेत ही परंतु त्या गटाकडे सर्व काय आहे त्यांच्याकडे छोट्या छोट्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांपासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत उपभोगलेले सर्वच आहेत तरीसुद्धा संविधानाने दिलेल्या छोट्या छोट्या गटाला छोट्या छोट्या समूहाला तळागाळातील दुर्लक्षित समुदायाला थोडासा हक्क दिला आणि त्या हक्कावरती या खुर्ची साठी वखवखलेले सत्तापीपासून यांची नजर या छोट्या गटातील हक्कावरती पडली आणि अशांततेचा डोम उसळला खरे तर या लहान गटातील अवस्था इतकी बिकट आहे की त्यांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही त्यासाठी त्यांना डोंबाऱ्याचा खेळ गारुड्याचा खेळ हाताला पडतील ती कामे बहुरूपी सोंग भंगार संघर गोळा करणे शेळ्या मेंढ्या पाळणे छोटे छोटे दुग्ध व्यवसाय करणे आणखी काय बरेच छोटे छोटे असेल ती छोटीशी शेती कसणे व्यवसाय करणारे या समूहात आहेत परंतु या प्रस्थापितांकडे पाणलोट क्षेत्रातील भरमसाठ शेती शहरालगत कारखानदारी दूध डेऱ्या दूध संकलन केंद्र साखर कारखानदारी आणि त्यातूनच मोठमोठे बिल्डर्स कंत्राटदार प्रस्थापितंकडेच आहेत गावातील ग्रामपंचायत सहकार सोसायटी पतसंस्था सहकारी बँका पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षण संस्था आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सर्व यात समुदायाच्या आहेत आणि यांनीच अशा त्यांच्यातीलच समुदायाला दुर्लक्षित केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की आपला वाटा या छोट्या समुदायांनी घेतला आहे यांच्यामध्ये आहे आणि मग काय हा पूर्ण शिकलेला समाज अगदी यूपीएससी एमपीएससी ते सचिव पदापर्यंत पोहोचलेले सर्वच या प्रस्थापित समुदायाच्या आहेत तरीसुद्धा यांना या लहान गटाचे कुठेतरी बोटावर मोजण्याइतके मुलं शिकून समोरून अगदी अति तटीचा संघर्ष करून पात्र होतात तर हेच प्रस्थापित यांना पैशाची मागणी करून त्यांना धुडकावून लावतात कारण मोक्याच्या जागी यांचेच लागेबांधे असलेले वर्ण व्यवस्थेतील स्वतःला उच्चवर्णीय म्हणून घेणारा वर्ग आहे तो वर्ग या प्रसार प्रस्थापितांना हाताशी धरून त्यांचे वर्चस्व शाबूत राहण्यासाठी या त्यांच्यातील आक्रमक अशा गटाला खालील छोट्या छोट्या समूहाला या दबलेल्या पिचलेल्या शांत अशा समुदावर दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी आणि त्यांची हुजरेगिरी करायला लावण्यासाठी करण्यासाठी लोक पाहिजेत म्हणून अशांतता पसरवून या आक्रमक गटाचा वापर करून इतर खालील दबलेल्या पिचलेल्या लोकांना वेठीस धरलेल आहे आणि ते करत असताना त्यांच्यावरती कायम दबाव राहून ते म्हणाले तसेच ऐकावे म्हणून प्रशासनाला वेठीस धरण्यास सुरुवात केली ती गेली कित्येक वर्षापासून हा प्रयोग चालू होता आणि त्याचा उच्चांक गाठला तो गेल्या दोन महिन्यापासून आणि मग खालचा दबलेला पिचलेला समाज थोडा विचार करू लागला आणि त्यासाठी महापुरुषांच्या प्रेरणेने सत्यशोधक बनून सत्य शोधण्याचा प्रयत्न करू लागला आणि सत्यसमोर येऊ लागले त्यांच्या मनात भीती उत्पन्न झाली आपण आपलं तुटपुंज छोटसं सर्वस्व गमवत आहोत ही जाणीव झाली आणि या गरीब समूहासाठी या समूहातील झगडणारे पुढे येऊन फक्त छोट्या गटातील अस्तव्यस्त झालेले पांगलेले सर्व स्तरातील सर्वच एकत्र आले संविधान मार्गाने आणि शांततेने आपला विचार विनिमय होण्यासाठी 17/ 11/ 2023 रोजी एक मे मेळावा आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्रभरातून तेली तांबोळी माळी साळी कोळी वंजारी गारुडी बहुरूपी नाव्ही कुंभार 364 छोट्या छोट्या समूहापैकी बहुतांश सर्वच या मेळाव्यासाठी शांततेच्या मार्गाने स्वतःची चटणी भाकरी घेऊन स्वतःचे पाणी घेऊन उपस्थित राहिले आणि आपल्या समूहातील मार्गदर्शकांची मार्गदर्शन ऐकण्यासाठी आले त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कुठेही आरडाओरडा नाही कुठेही कांगावा नाही कुठेही कसल्याही प्रकारची नासधूस नाही आयोजकांनी संयोजकांनी आणि प्रशासनातील पोलीस बांधवांनी दाखवून दिलेल्या मार्गाने निश्चित स्थळी एकत्र येऊन लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनास विनंती वजा हाक दिलेली आहे आम्हाला आपल्या भारताच्या संविधानावरती विश्वास आहे की आपले प्रस्थापित या संविधानाच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय करणार नाही आमच्यावरती होत असलेला अन्याय दूर करतील आणि आमच्या हक्काचं कोणालाही देणार नसून ज्या समाजाची काही वेगळी मागणी असेल ती मागणी सुद्धा प्रशासन पूर्ण करोत हीच विनंती आम्हा सर्व या समुदायाची असेल आणि आहे आणि राहील सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button