महाराष्ट्र

“कितीही शिव्या दिल्या तरी ओबीसी समाजाच्या आरक्षणाची लढाई निकराने लढणार!” – समाजाचा ठाम निर्धार !

यवतमाळ/वर्धा, दि. 26 सप्टेंबर :
आज यवतमाळ आणि वर्धा येथे ओबीसी समाजाच्या महत्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत समाजाच्या विविध घटकांनी स्पष्ट संदेश दिला की – आरक्षण हा काही गरिबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा मार्ग आहे.

10 ऑक्टोबरच्या सकल ओबीसी महामोर्चाची घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिव्यांची लाखोली सुरू झाली आहे. सोशल मीडियावरून व फोनवरून वैयक्तिक टीका केली जात असूनही ही लढाई थांबवली जाणार नाही.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आहे, त्यावर आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणावर कुणी डल्ला मारू नये. आधीच 54 टक्के लोकसंख्येला केवळ 27 टक्के आरक्षण मिळत असल्याने समाजातील तरुणांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.

ओपन कॅटेगरीवरील जुना GR बदलून सरकारने ओबीसी तरुणांचे नुकसान केले आहे. महामंडळांना निधी नाही, कर्जयोजना नाहीत, निधी ठप्प आहे, तरीही सरकार “आमचा DNA ओबीसी आहे” म्हणत फसवणूक करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.

2 सप्टेंबरचा मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा शासन निर्णय रद्द करण्यासाठी 10 ऑक्टोबरला होणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले.

दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01

लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा
नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button